बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील आणखी दोन ट्रॉलर कारवारात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:05 IST2020-05-06T16:05:30+5:302020-05-06T16:05:42+5:30
एलईडी दिवे वापरून मासेमारी

बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील आणखी दोन ट्रॉलर कारवारात जप्त
मडगाव: एलईडी दिवे लावून बेकायदा मासेमारी करणारे गोव्यातील दोन ट्रॉलर मागच्या आठवड्यात कारवार येथे जप्त केलेले असतानाच त्याप्रकारे परत मासेमारी करणारे आणखी दोन ट्रॉलर दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या ट्रॉलरांची नावे काँसीप आणि सी रोज अशी असून त्यावर एकूण 39 खलाशी होते. मागच्या आठवड्यातही अशाच प्रकारे गोव्यातील दोन ट्रॉलर पकडून त्यावरून 28 खलाशाना पकडले होते.
आता नव्याने पकडण्यात आलेल्या 39 खलशापैकी 5 स्थानिक खलाशी असून त्यातील एक कोडीबाग तर 4 जण अवरसा या भागातील असल्याचे समजते. या सर्व खलाशाना सध्या क्वारान्टीन करून ठेवण्यात आले आहे.गोव्यातून येणाऱ्या ट्रॉलरकडून नियमित अशी आगळीक होत असून त्यावर कोस्ट गार्डने नियंत्रण ठेवावे अशी मागणी करवारचे मासेमार करत आहेत.