विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन दुकानांना ठोकले टाळे
By पंकज शेट्ये | Published: October 30, 2023 03:06 PM2023-10-30T15:06:02+5:302023-10-30T15:07:01+5:30
मुरगाव पालिकेच्या हद्दीत २५० जण विनापरवाना आणि परवान्याचे नुतनीकरण न करता करित आहेत व्यापार
वास्को: मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील वास्को शहर इत्यादी बाजारात व्यापार परवान्याशिवाय व्यावसाय करणाऱ्यांवर मुरगाव नगरपालिकेने सोमवार (दि.३०) पासून कारवाई करण्यास सुरवात केली आहे. अनेक वर्षापासून व्यापार परवाना न काढता वास्कोत व्यवसाय करणाऱ्या दोन दुकानावर मुरगाव नगरपालिकेने सोमवारी कारवाई करून त्यांना सील ठोकले.
सोमवारी मुरगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून वास्कोतील ‘अंकीत बुक सेंण्टर’ आणि ‘रॉयल हार्डवेअर ॲण्ड सॅनीटरी’ ह्या दुकानांना सील ठोकले. त्याबाबत माहीती घेण्यासाठी मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांना संपर्क केला असता ते दोन्ही दुकानदार अनेक वर्षापासून व्यापार परवाना न काढता व्यावसाय करत असल्याची माहीती दिली. ‘अंकीत बुक सेंटर’ दुकान सुमारे ३० वर्षापासून व्यवसाय करत असून त्यांनी अजूनही व्यापार परवाना काढला नसल्याचे आढळून आले असून दुसरा दुकानदार सुद्धा विनापरवाना अनेक वर्षापासून व्यवसाय करत होता. मुरगाव पालिकेच्या हद्दीत व्यापार - व्यवसाय करणाऱ्यांनी परवाना काढून आणि त्याचे दरवर्षी नुतनीकरण करून व्यवसाय करावा असे अनेकदा सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा अनेक जण वास्कोत आणि मुरगाव पालिकेच्या हद्दीत परवाना न काढता आणि परवान्याचे नुतनीकरण न करता व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याची माहीती नगराध्यक्ष बोरकर यांनी दिली.
मुरगाव पालिकेच्या हद्दीत कीती व्यावारी - व्यावसाय करणाऱ्यांशी व्यापार परवाना आहे ते जाणून घेण्यासाठी गेल्या १० दिवसापासून पालिकेचे अधिकारी - कर्मचारी बाजारात त्याबाबत तपासणी करित आहेत. अजूनपर्यंतच्या तपासणीत मुरगाव पालिकेच्या हद्दीत २५० जण विना व्यापार परवाना आणि काही वर्षापासून व्यापार परवान्याचे नुतनीकरण न करता व्यापार - व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले. पालिकेचा महसूल न भरता व्यवसाय करणे अयोग्य प्रकार असून विना परवाना व्यापार करणाऱ्यांनी त्वरित परवान्यासाठी अर्ज करून परवाना काढावा. तसेच ज्यांनी परवान्याचे नुतनीकरण केले नाही त्यांनी ते त्वरित करावे असे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगून अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करून दुकानांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.