जुन्या काळातील गाजलेल्या दोन ट्रम्पेट वादकांना गोव्यात मानाचा मुजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:29 PM2019-04-29T20:29:18+5:302019-04-29T20:29:27+5:30
पाश्र्चिमात्य संगीताचे गोव्यातून धडे गिरविलेले आणि नंतर मुंबईत जाऊन बॉलिवूड काबीज केलेले दोन समकालीन संगीतकार क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड या दोन दिग्गज ट्रम्पेट वादकांचा मरणोत्तर सन्मान होण्याची आगळीवेगळी घटना या आठवडय़ात गोव्यात होणार आहे.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव - पाश्र्चिमात्य संगीताचे गोव्यातून धडे गिरविलेले आणि नंतर मुंबईत जाऊन बॉलिवूड काबीज केलेले दोन समकालीन संगीतकार क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड या दोन दिग्गज ट्रम्पेट वादकांचा मरणोत्तर सन्मान होण्याची आगळीवेगळी घटना या आठवडय़ात गोव्यात होणार असून महान ट्रम्पेट वादक क्रिस पेरी यांचे नाव मडगावातील रस्त्याला देण्याचा कार्यक्रम 2 मे रोजी होणार आहे. तर फिल्म निर्माते व ट्रम्पेट वादक फ्रँक फर्नाड यांची जन्मशताद्बी 3 मे रोजी पणजीत साजरी केली जाणार आहे.
2 मे पासून मडगावात चार दिवसांचा वारसा महोत्सव आयोजीत करण्यात आला असून याच महोत्सवाचा एक भाग म्हणून ज्या भागात क्रिस पेरी यांचा जन्म झाला त्या भागातील रस्त्याला या महान संगीतकाराचे नाव देण्यात येणार आहे. तर फ्रँक फर्नाड यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त पणजीत होणा:या कार्यक्रमात त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे.
पोतरुगीज काळात गोव्यात अनेक दिग्गज संगीतकार निर्माण झाले. मात्र त्यातल्या ब:याच जणांनी मुंबईत जाऊन आपले नशिब अजमावले. क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड हे त्यापैकीच एक. या दोघांचाही प्रवास गोव्यात लोकप्रिय असलेल्या तियात्र रंगमंचावरुन झाला. मात्र मुंबईत गेल्यावर त्यांनी आपल्या वादनांतून बॉलिवूड क्षेत्रवर वकूब गाजवला.
यातील क्रिस पेरी यांचे नाव त्यांनी ह्यकभी कभीह्ण व ह्यत्रिशूलह्ण या गाजलेल्या हिंदी चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे सर्वाच्या मुखी झाले. एक उत्कृष्ट ट्रम्पेटवादक म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिस पेरी (क्रिस्तीवाव परेरा) हे सेक्साफोन, बासरी, कि-बोर्ड पियानो व गितार ही वाद्येही कुशलतेने हाताळायचे. त्यांनी संगीत दिलेली कित्येक कोंकणी कातारे लॉर्ना यांच्यामुळे संपूर्ण जगात जिथे जिथे कोंकणी माणूस आहे तिथर्पयत पोहोचली आहेत.
यंदा जन्मशताब्दी वर्ष असलेले फ्रँक फर्नाड (फ्रँकलिन फर्नाडिस) हे कुडचडे गावातील असून कुडचडेच्या चर्च स्कूलमध्ये व्हायोलिन व ट्रम्पेटचे धडे घेऊन नंतर मुंबईत गेले. बॉलिवूडमध्ये जुन्या काळातील गाजलेले संगीतकार सचिनदेव बर्मन, अनिल बिस्वास, राजेश रोशन, सी. रामचंद्र, कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदात त्यांनी आपला कला पेश केली. फर्नाड यांनी निर्माण केलेले आणि स्वत: संगीतबद्ध केलेले आमचे नशिब, निर्मोण आणि म्हुजी घोरकान्न या चित्रपटातून कोंकणी संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली होती. फर्नाड यांच्याशी क्रिस पॅरी यांचीही समानता असून कोंकणीतील पहिला रंगीत चित्रपट असलेला ह्यभुंयेरांतलो मुनीसह्ण हा चित्रपट क्रिस पॅरी यांनी निर्माण केला होता. आशा भोसले यासारख्या गायिकेला त्यांनी प्रथमच कोंकणीत आणून त्यावेळी एक विक्रमच केला होता.