दोन घरातील चोरी प्रकरणात २० वर्षीय तरुण वास्कोत गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 08:59 PM2019-09-29T20:59:31+5:302019-09-29T20:59:43+5:30
अटक केलेल्या मायकल मार्टींन्स ह्या तरुणाकडून चोरीला गेलेली दुचाकी पोलीसांनी केली जप्त
वास्को: रविवारी वाडे, वास्को भागातील दोन घरात झालेल्या चोरी प्रकरणाचा वास्को पोलीसांनी २४ तासाच्या आत छडा लावून संध्याकाळी ५.३० वाजता ह्या प्रकरणातील संशयित मायकल मार्टींन्स ह्या २० वर्षीय तरुणाला अटक करून त्यांने चोरी केलेली दुचाकी जप्त केली. वाडे येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महादेव दुबल याच्या घराच्या मागच्या बाजूतील खिडकी त्या संशयित चोरट्यांने उघडून घरातील मालमत्तेची चोरी केल्यानंतर त्यांच्या शेजाºयाच्या घरातही चोरी करून त्यांने दुबल यांच्या मालकीची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलीसांना तपासणी उघड झाले आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश राणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सदर चोरी प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. वाडे, वास्को येथे राहणाºया महादेव दुबल याच्या घरात संशयित चोरट्यांने मागून प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घरात असलेली १५ हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल तसेच हॅडफोन लंपास केला. तसेच दुबल यांच्या शेजाऱ्याला राहणाऱ्या नागरीकाच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून येथील मोबाईल सुद्धा लंपास केल्यानंतर दुबल यांच्या मालकीची एक्टीव्हा दुचाकी (क्र: जीए ०६ एच ९८४८) घेऊन घटनास्थळावरून पोबारा काढला. दोन्ही घरात मिळून त्या अज्ञात चोरट्यांने १ लाख ५ हजार ९५६ रुपयांची मालमत्ता लंपास केल्याचे पोलीसांना समजताच त्यांनी ह्या प्रकरणात चौकशी करण्यास सुरवात केली. रविवारी संध्याकाळी पोलीसांनी नवेवाडे भागात राहणाºया २० वर्षीय मायकल मार्टींन्स याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली ती ‘एक्टीव्हा’ दुचाकी जप्त केली. तपासणीच्या वेळी महादेव दुबल व शेजाºयाच्या घरातून चोरी केलेली असल्याचे संशयित मायकल यांनी कबूल केले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी पुढे दिली. वास्को पोलीसांनी सदर चोरी प्रकरणात भादस ४५४, ४५७, ३८० कलमाखाली मायकल विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली असल्याचे निरीक्षक निलेश राणे यांनी सांगितले. चोरीला गेलेली इतर मालमत्ता कुठे आहे याचाही पोलीस सध्या तपास करीत आहेत. तसेच संशयित मायकल याचा अन्य चोरीत हात आहे काय याबाबतही चौकशी चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.