युजीसीचा विद्यापीठ जागा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; एनएसयुआय व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसची टीका
By पूजा प्रभूगावकर | Published: January 31, 2024 01:24 PM2024-01-31T13:24:28+5:302024-01-31T13:24:39+5:30
उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांचे जर आरक्षण रद्द केले.
पणजी: विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) ने उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेल्या जागांवर जर त्या समाजाच्या पुरेशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर त्या जागांचे आरक्षण रद्द केले जाईल असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय हा अन्यायकारक असल्याचा आराेप एनएसयुआय व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत केला.
उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांचे जर आरक्षण रद्द केले. तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अडचण येईल. युजीसीने आपला निर्णय रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रेद, एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी, नितीन पाटकर व अरहाज मुल्ला उपस्थित हाेते.