बाबूशच्या पक्ष स्थापनेस अन्य आमदारांचे असहकार्य

By admin | Published: February 20, 2015 01:31 AM2015-02-20T01:31:34+5:302015-02-20T01:31:49+5:30

पणजी : आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा पक्ष स्थापन करू, अशा वल्गना केल्या तरी, प्रत्यक्षात अन्य आमदारांचे त्यांना सहकार्य मिळत नाही हे गेल्या दोन दिवसांत स्पष्ट झाले आहे.

Unconscious of other legislators of Babush's party setup | बाबूशच्या पक्ष स्थापनेस अन्य आमदारांचे असहकार्य

बाबूशच्या पक्ष स्थापनेस अन्य आमदारांचे असहकार्य

Next

पणजी : आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा पक्ष स्थापन करू, अशा वल्गना केल्या तरी, प्रत्यक्षात अन्य आमदारांचे त्यांना सहकार्य मिळत नाही हे गेल्या दोन दिवसांत स्पष्ट झाले आहे.
मोन्सेरात यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा ठराव काँग्रेसने केला तरी, अजून त्यांना त्याबाबतची लेखी स्वरूपात कल्पना दिलेली नाही. अजूनही त्यांना काँग्रेसने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवलेली नाही. मात्र, मोन्सेरात यांची हकालपट्टी करावीच, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार यांनीही ठरविले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो हेही त्याच मताचे आहेत. त्यामुळे लवकरच हकालपट्टीचा आदेश निघेल. तथापि, गेल्या दोन दिवसांत मोन्सेरात यांची चाचपणी करून पाहिली तरी नवा पक्ष स्थापन करण्याबाबत त्यांना अन्य आमदारांचे सहकार्य मिळत नाही, हे स्पष्ट झाले आहे. मोन्सेरात यांचे राजकारण हे बेभरवशाचे असते. ते ऐनवेळी भूमिका बदलू शकतात. त्यामुळे अन्य आमदार त्यांच्या चालींवर विश्वास ठेवत नाहीत. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपण मोन्सेरात यांच्यासोबत जाणार नाही, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. माविन गुदिन्हो यांचे तर मोन्सेरात यांच्याशी पटतच नाही. अन्य अपक्ष आमदार रोहन खंवटे, नरेश सावळ हेही सध्या मोन्सेरात यांच्यापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याची कल्पना प्रत्यक्षात येणारच नाही, असे संकेत मिळत आहेत. मोन्सेरात यांची पत्नी व ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या काँग्रेसमध्येच राहणार आहेत.
एकदा काँग्रेसने हकालपट्टीचा आदेश जारी केल्यानंतर मग मोन्सेरात यांना भाजप मंत्रिमंडळात स्थान द्यावे व मगोला शह द्यावा, असाही विचार भाजपमधील एका गटाने पुढे आणल्याचे सूत्रांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Unconscious of other legislators of Babush's party setup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.