‘सत्यकाम यांच्या देखरेखीखाली व्यवहार’

By admin | Published: August 5, 2015 01:33 AM2015-08-05T01:33:06+5:302015-08-05T01:33:30+5:30

‘सत्यकाम यांच्या देखरेखीखाली व्यवहार’

'Under the supervision of Satyamam' | ‘सत्यकाम यांच्या देखरेखीखाली व्यवहार’

‘सत्यकाम यांच्या देखरेखीखाली व्यवहार’

Next

पणजी : जैका प्रकरणात लाच देण्याच्या व्यवहाराची पूर्ण कल्पना लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांना होती आणि त्यांच्या सूचनांवरूनच सर्व व्यवहार झाले होते, अशी माहिती क्राईम ब्रँचने सत्र न्यायालयाला दिली. मोहंती यांना सोमवारी अटक करण्यात आली होती.
मोहंती यांना रिमांड मिळविण्यासाठी क्राईम ब्रँचकडून करण्यात आलेल्या दाव्यात मोहंती यांचा लाच प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले आहे. कंत्राट मिळविण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा मंत्री लाच मागत असतील, तरी ती देऊन कंत्राट घेण्याच्या सूचना विभागीय कार्यालयातूनच आल्या होत्या. विभागीय कार्यालयाच्या देखरेखीखाली सर्व व्यवहार झाले आहेत. मोहंती हे त्या वेळी म्हणजे २०१० सालात या कार्यालयाचे प्रमुख होते, असा क्राईम ब्रँचच्या तपासाचा निष्कर्ष आहे. न्यायालयात तसा जोरदार दावा केल्यानंतर संशयिताला ३ दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
क्राईम ब्रँचच्या युक्तिवादाला प्रतिवाद करताना संशयिताच्या वकिलाने मोहंती यांच्या अटकेची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले. मोहंती यांना समन्स बजावण्यात आले नसतानाही ते क्राईम ब्रँचमध्ये हजर राहिले आहेत. (पान २ वर)

Web Title: 'Under the supervision of Satyamam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.