बेराेजगारी ठरतेय गाेव्याची मुख्य समस्या; नोटाबंदी, मजुरांची पायपीट अजूनही स्मरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:04 AM2022-02-11T08:04:25+5:302022-02-11T08:06:36+5:30

गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला.

Unemployment is the main problem of the village; Denomination, labor pipeline still remembered | बेराेजगारी ठरतेय गाेव्याची मुख्य समस्या; नोटाबंदी, मजुरांची पायपीट अजूनही स्मरणात

बेराेजगारी ठरतेय गाेव्याची मुख्य समस्या; नोटाबंदी, मजुरांची पायपीट अजूनही स्मरणात

googlenewsNext

राजेश निस्ताने
पणजी
: नोटाबंदी होऊन आता ६ वर्षे लोटली; परंतु नोटाबंदी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील व्यापारी-व्यावसायिकांचा राग अद्याप शमलेला नसल्याचे चित्र गोव्यातही पाहायला मिळत आहे.

गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला. नोटाबंदीने उद्योग, व्यापार, व्यवसाय आधीच जर्जर झालेले असताना त्यात कोरोनाचा मार पडला.

कोरोनाकाळात मजुरांना पायी आपले गाव गाठावे लागल्याची आठवण परप्रांतीय व्यावसायिकांनी यावेळी करून दिली. श्रीमंतांना आणण्यासाठी विमाने पाठविणाऱ्या भाजप सरकारला स्थानिक मजुरांसाठी रेल्वे, ट्रक, बसची व्यवस्था करता येऊ नये या दुजाभावाने परप्रांतीयांच्या मनात घर केेलेले दिसले. या आठवणी ताज्या झाल्या की त्याचा फटका गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार असे व्यापारी स्पष्ट बोलत आहेत. एवढेच नव्हे तर मते मागायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ‘आम्ही अजून नोटाबंदी आणि मजुरांच्या पायी स्थलांतराचे ते दिवस विसरलेलो नाही’ याची आठवण करून देत असल्याचे सांगण्यात आले.दोन हजारांची नोटदाखविली अन् मार खाल्लाएका भांडे विक्रेत्याने सांगितले की, नोटाबंदी काळात मला दोन हजारांची नोट मिळाली म्हणून मी जाम खुश होतो. हॉटेलात जाऊन नास्ता केला. ७० रुपयांचे बिल देण्यासाठी दोन हजारांची नोट दिली असता एवढी चिल्लर कोठून आणू असे म्हणत हॉटेल मालकाने वाद घालून मला मारहाण केली. दोन हजारांच्या नोटेने मार खावा लागल्याचे हे अनोखे उदाहरण गोव्यात पुढे आले.

मुले घरात बसून; वडील चिंतित
- भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत रोजगारनिर्मितीसाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे बापलेक सांगतात. 
- चांगले शिक्षण घेऊनही मुले रोजगाराशिवाय घरात बसून आहेत. 
- बेरोजगारी ही गोव्यातील सुशिक्षित तरुणांसाठी प्रमुख समस्या बनली आहे. त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
 

Web Title: Unemployment is the main problem of the village; Denomination, labor pipeline still remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.