सासष्टीतील मंत्री-आमदार मुख्यमंत्र्यांसाठी ‘डोकेदुखी’

By admin | Published: May 14, 2015 01:41 AM2015-05-14T01:41:07+5:302015-05-14T01:41:22+5:30

सासष्टी तालुक्यातील व विशेषत: सासष्टीच्या आसपासच्या भागातील मंत्री-आमदारांना सांभाळणे, त्यांना समजावणे व समजून घेणे, ही एक

Union minister and MLAs face 'headache' for CM | सासष्टीतील मंत्री-आमदार मुख्यमंत्र्यांसाठी ‘डोकेदुखी’

सासष्टीतील मंत्री-आमदार मुख्यमंत्र्यांसाठी ‘डोकेदुखी’

Next

सद्गुरू पाटील ल्ल पणजी
मोठी कटकटीची, कसरतीची
आणि तितकीच नाजूक अशी गोष्ट बनल्याचा अनुभव मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना येत आहे.
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनाही सासष्टीतील मंत्री व आमदारांना सांभाळून घेताना बरीच कसरत करावी लागत होती. सासष्टीतीलच मंत्री-आमदार जास्त तापदायक व कधी कधी त्रासदायकही ठरतात,
असा अनुभव पर्रीकर यांना नेहमीच आला. पर्रीकर
प्रथम मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा त्यांच्या सरकारने गुड फ्रायडेच्या सुट्टीला कात्री लावताच दक्षिण गोव्यातील आणि विशेषत: सासष्टी व मुरगाव तालुक्यातील
त्या वेळच्या काही मंत्री-आमदारांनी बंडाची भूमिका
घेतली होती. त्यानंतर मिकी पाशेको यांच्याविषयीही पर्रीकर यांना कटू अनुभव आले.
विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर यांनाही सासष्टी व आसपासच्या भागातील काही मंत्री-आमदारांविषयी काहीसा तसाच अनुभव येत असल्याचे जाणवते. कुठ्ठाळी मतदारसंघातून निवडून आलेल्या वनमंत्री एलिना साल्ढाणा यांना मुख्यमंत्री पार्सेकर हे आदराने वागवतात. मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री व स्वर्गीय माथानी साल्ढाणा यांच्या त्या पत्नी म्हणून पार्सेकरांकडून त्यांचा जास्त मान राखला जातो, असे भाजपच्या काही आमदारांचे म्हणणे आहे. मात्र, कधी मोपा विमानतळ, कधी गोव्याच्या खास दर्जाचा विषय, कधी मरिना अशा विषयांवरून मंत्री एलिना तापदायक ठरू लागल्या आहेत. त्यांनी तोंड बंद करून गप्प राहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नव्हते. आपल्या म्हणण्याचा मतितार्थ तसा मुळीच नव्हता, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Union minister and MLAs face 'headache' for CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.