गोव्यातील अनोखे वीरभद्र नृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 04:35 PM2018-03-17T16:35:21+5:302018-03-17T16:35:21+5:30
गोव्यात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. या उत्सवात पारंपरिक प्रथा, परंपरांचे उत्साहाने पालन केले जाते.
गोवा : गोव्यात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. या उत्सवात पारंपरिक प्रथा, परंपरांचे उत्साहाने पालन केले जाते. त्यातीलच एक प्रथा म्हणजे वीरभद्र नृत्य. गुढी पाडव्याला गोव्यातील सांगे,फोंडा व साखळी तालुक्यातील काही गावात वीरभद्र हा पारंपरिक नृत्य प्रकार केला जातो.
प्राचीन दंतकथेनुसार प्रजापती दक्षाच्या सभेत अपमानित झालेली पार्वती तेथेच आपला प्राण देते,हे समजल्यावर क्रोधीत होऊन शंकर अक्राळ विक्राळ अशा वीरभद्राला तयार करतो,पुढे हा रौद्ररुपी वीरभद्र दक्षाची सभा उधळून लावून त्याचा वध करतो.या प्रसंगाची आठवण म्हणून हे नृत्य केले जाते.
नृत्याच्या वेळी वीरभद्राने केलेला दाक्षिणात्य पद्धतीचा पोषाख तसेच नृत्याच्यावेळी वापरले जाणारे कन्नड शब्द यावरून ही प्रथा गोव्यावर जेंव्हा विजयनगरचे राज्य होते त्याकाळातील असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.
फोंडा येथील विठोबा मंदिराजवळ झालेल्या या वीरभद्र नृत्याचा हा व्हिडीओ
व्हिडीओ - पिनाक कल्लोळी