'युनिटी मॉल'मुळे खारफुटी धोक्यात: विजय सरदेसाई; जागा बदलण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 09:33 AM2023-09-16T09:33:13+5:302023-09-16T09:33:41+5:30

किनारपट्टी स्थिरीकरण आणि जलशुद्धीकरण तसेच वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान म्हणून खारफुटी महत्त्वाची भूमिका बजावते.

unity mall threatens mangroves said vijai sardesai and demand for change of venue | 'युनिटी मॉल'मुळे खारफुटी धोक्यात: विजय सरदेसाई; जागा बदलण्याची मागणी

'युनिटी मॉल'मुळे खारफुटी धोक्यात: विजय सरदेसाई; जागा बदलण्याची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मेरशी येथे येऊ घातलेल्या 'युनिटी मॉल'मुळे तब्बल ७० हजार चौ.मी. खारफुटी धोक्यात येईल. शिवाय २५ हजार चौ.मी. भातशेतीची जमीनही नष्ट होणार आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले असून हे पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन सरकारने जागा जर बदलली नाही तर राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) कडे जाऊ, असा इशारा दिला आहे.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या अखत्यारित असलेली ही जमीन पर्यटन खात्याला युनिटी मॉलसाठी देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत संमत झाला. या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

सरकारला डोळ्यांसमोर मोठा आर्थिक फायदा दिसत असला तरी पर्यावरणाची जी हानी होणार ती त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असून, त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे प्रत्यक्षात घाट्याचा सौदा असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. ज्या जागेत हा प्रकल्प येऊ घातला आहे तो सखल भातशेतीचा भाग असून पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील खारफुटी क्षेत्राचा त्यात समावेश आहे.

सरदेसाई म्हणाले की, मागील दोन वर्षांत या भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहे. किनारपट्टी स्थिरीकरण आणि जलशुद्धीकरण तसेच वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे निवासस्थान म्हणून खारफुटी महत्त्वाची भूमिका बजावते.

... तर पणजीतही येईल पूर

- समुद्रसपाटीपासून ५ मीटरच्या उंचीवर असलेले हे क्षेत्र पुरावेळी बफर झोन म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे या भागातील लोकांचे हे क्षेत्र पूर येण्यापासून संरक्षण करू शकते.

- या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम आल्यास ते या भागासाठीच नव्हे तर पण- जीमध्येही पूरस्थिती निर्माण करु शकते. याची दखल घेऊन सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

- पणजीत आधीच पावसाळ्यात पूर येतो. ही स्थिती आणखी बिकट बनू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: unity mall threatens mangroves said vijai sardesai and demand for change of venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.