विद्यापीठे संशोधनात कमीच - राष्ट्रपती
By admin | Published: April 26, 2017 01:45 AM2017-04-26T01:45:37+5:302017-04-26T01:45:37+5:30
देशातील विद्यापीठे मूलभूत संशोधनाच्या बाबतीत कमी पडत आहेत, अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त येथे केली.
पणजी : देशातील विद्यापीठे मूलभूत संशोधनाच्या बाबतीत कमी पडत आहेत, अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त येथे केली. संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठे आणि उद्योग यांनी मिळून बरेच काही करता येण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. मुखर्जी यांना मंगळवारी कुलपती या नात्याने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गोवा विद्यापीठाची डी. लिट. पदवी देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विद्यापीठाचे कुलगुरू वरुण साहनी, प्रबंधक वाय. व्ही. रेड्डी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात आज मुलीच अधिक चमकत असल्याचे दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. शिक्षणाने महिलांचे सबलीकरण झाल्यास त्याचा मोठा फायदा समाजाला होईल. तंत्रज्ञानाचा दर्जा वाढविणे हेदेखील मोठे आव्हान आहे. याबाबत केवळ विद्यापीठाकडूनच अपेक्षा करून चालणार नाही. उद्योग तसेच स्वयंसेवी संघटनांनीही या बाबतीत योगदान द्यावे लागेल, असेही राष्ट्रपती म्हणाले. (प्रतिनिधी)