अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रीय ट्रॉफमुळे
By वासुदेव.पागी | Published: April 20, 2024 03:53 PM2024-04-20T15:53:39+5:302024-04-20T15:54:28+5:30
मराठवाडा ते उत्तर कर्माटक दरम्यान एक ट्रॉफ आकार घेत असलेला १६ एप्रील रोजीआढळून आला होता. भारतीय हवामान खात्याने त्याचा अलर्टही जारी केला होता.
पणजी - अचानक आभाळ अंधारून येवून गोव्यात सर्वत्र दीड तास कोसळलेला जोरदार पाऊस हा विदर्भ ते मध्य अरबी समुद्रातील सक्रीय ट्रॉफमुळे पडल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारीही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मराठवाडा ते उत्तर कर्माटक दरम्यान एक ट्रॉफ आकार घेत असलेला १६ एप्रील रोजीआढळून आला होता. भारतीय हवामान खात्याने त्याचा अलर्टही जारी केला होता. परंतु हा ट्रॉफ पच्छिमेच्या दिशेने सरकू लागला असून तो सक्रीय बनला आहे. विदर्भ ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत तो पसरला आहे.
शनिवारी सकाळी पडलेला जोरदार पाऊस याच ट्रॉफचा परिणाम आहे. रविवारीही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याच्या डॉप्लर रडारद्वारे टीपलेल्या आकाशाच्या छायाचित्रात पेडणे, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, सांगे, फोंडा, तिसवाडी आणि सास्टी तालुक्यांवर पावसाचे ढग दिसत होते. हवेची दिशा पश्चिमेकडे राहिल्यामुळे अरबी समुद्राच्या दिशेने हे ढग जात आहेत.