श्रीगणेशाचे उपासनाशास्त्र, शास्त्रोक्त पूजा विधी; दूर्वा अन् फुले कशी वाहावी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:12 AM2023-09-18T10:12:57+5:302023-09-18T10:14:28+5:30

Ganesh Chaturthi 2023: गणेश देवतेच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

upasana shastra of shri ganesha worship rituals know about how to carry durva and flowers | श्रीगणेशाचे उपासनाशास्त्र, शास्त्रोक्त पूजा विधी; दूर्वा अन् फुले कशी वाहावी? जाणून घ्या

श्रीगणेशाचे उपासनाशास्त्र, शास्त्रोक्त पूजा विधी; दूर्वा अन् फुले कशी वाहावी? जाणून घ्या

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2023: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ गणेश चतुर्थीचा उत्सव मंगळवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश देवतेच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपती हे श्री गणेशाचे एक नाव आहे. गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्रक. पती म्हणजे पालन करणारा. गणपती सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो. श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी गणेश पूजन असते. गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे. मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत राहते.

स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार, गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. मध्व मुनिश्वरांनी वे गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती ॥ अशी गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे. 

कार्यारंभी गणेशाच्या पूजनाचे महत्त्व

गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते: म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपतीच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात. श्री गणेश हे सर्व संतांनी गौरविलेले आराध्यदैवत आहे." निरनिराळ्या साधना मार्गातील संत वेगवेगळ्या देवतांचे भक्त असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी आणि त्याचे स्तवन आवर्जून केले आहे.

पूजेचा गणपती कसा असावा?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तिशाली आणि जागृत आहे, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपती •असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून पूजाविधी पार पाडावे लागतात.' देवा गणपती तारक डाव्या सोंडेचा स्वरुपाचा, अध्यात्माला पूरक असतो. तांबड्या रंगात गणेशतत्त्व 'आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती जागृत होण्यास पूजेत रक्तचंदन वापरतात.

दूर्वा कशी वाहावी

दूर्वामध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक असते; म्हणून दूर्वा वाहाव्यात. त्यामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते, देवतेच्या तत्त्वाचा लाभ होतो. दूर्वा विषम संख्येने (३, ५, ७, २१) वाहाव्यात. दुर्वा वाहतांना पात्यांचा भाग आपल्याकडे देठाचा भाग मूर्तीकडे असावा.

फुले कशी वाहाल?

गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वाहवीत. फुले वाहताना ती ८ किंवा ८च्या पटीत, शंकरपाळ्याच्या आकारात वाहवी. फुले वाहताना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन राहतील, अशा पद्धतीने फुले वाहवीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहताना देव गणेशाच्या चरणांकडे आणि तुरा आपल्याकडे असे वाहावे.

अगरबत्ती कुठल्या वापराव्यात

गणेशाची पूजा करताना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरिता चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यापैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. गणेशाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात.

- तुळशीदास गांजेकर (संकलक)

 

Web Title: upasana shastra of shri ganesha worship rituals know about how to carry durva and flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.