'अर्बन नक्षल'च्या मुद्याला नव्याने फोडणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:41 AM2024-01-05T08:41:43+5:302024-01-05T08:42:51+5:30
भाजप चिंतन बैठकीत पुन्हा मांडला विषय, निवडणूक रणनीतीवर चर्चा.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/म्हापसा: राज्यात "अर्बन नक्षल' वावरत आहेत, अशा प्रकारचा मुद्दा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा म्हापशातील भाजप चिंतन बैठकीत मांडला. अर्बन नक्षल मुद्दा आपण यापूर्वी जाहीरपणे मांडताना खूप विचारपूर्वकच मांडला, कारण काही विरोधकांच्या कारवायाच तशा आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपचे चिंतन शिबिर काल म्हापशात पार पडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंतकुमार गौतम यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मावीन गुदिन्हो, विश्वजीत राणे, आलेक्स सिक्वेरा, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दिगंबर कामत, मायकल लोबो, गणेश गावकर, दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्ळेकर, फ्रान्सिस सिल्वेरा, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर, गोविंद पर्वतकर, सुलक्षणा सावंत, सुवर्णा तेंडुलकर, महानंद अस्नोडकर, रुपेश कामत आदी नेते उपस्थित होते.
'लोकमत'च्या कुजबुजचा उल्लेख
प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी स्वागत केले. त्यांनी सर्व मंत्र्यांना बजावले की, बैठकीतील माहिती गुप्त ठेवायला हवी. बैठकीत जी चर्चा होते ती गुप्त ठेवा. कुणीच बैठकीनंतर कुजबुज देण्याचा प्रयल करू नये. लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने रणनीतीवर आपण सर्वांनी चर्चा करावी. शेवटीं निर्णव है दिल्लीत होत असतात. उगाच कुणी राजकीय कुजबुज प्रसार माध्यमाला देऊ नये, असे तानावडे बोलले, काल 'लोकमत'मध्ये दक्षिण गोव्यातील राजकारणाविषयी प्रसिद्ध झालेल्या कुजबुजच्या पाश्र्वभूमीवर तानावडे यांनी आम्हाला गप्प राहण्याचा हा सल्ला दिला असल्याचे बैठकीस उपस्थित काहीजणांनी नंतर 'लोकमत' ला सांगितले.
जाणीवपूवर्क विधान...
आपण अर्बन नक्षलीचा विषय यापूर्वी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या एका बैठकीत मांडला होता, आपण चुकून बोललो नव्हतो तर मुद्दामच तसे बोललो होतो, असे मुख्यमंत्री कालच्या बैठकीत सांगितले. एका राजकीय पक्षाच्या काँग्रेस नव्हे) कारवाया ह्य राजकीय पक्षाप्रमाणे नाहीत, त्यांच्या कारवाया वेगळ्याच पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे लक्ष ठेवायला हवे व त्यासाठीच आपण अर्थन नक्षल, असा उल्लेख केला होता.
अर्बन नक्षलीचा मुद्दा मांडताना आपण कोणत्याही पक्षाचे किया विरोधकांमधील कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. त्यामुळे चितन बैठकीत हा मुद्दा पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मांडला, एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी अजेंडा निश्चित केला आहे. अर्बन नक्षलीविरोधात आपला सूर मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवल्याचे सर्व मंत्री व पदाधिकाऱ्यांना पहायला मिळाले.
बाबूश, गोविंद, नीळकंठ गैरहजर
चितन बैठकीला फक्त तिघेच मंत्री आले नाहीत. बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे व निळकंठ हळर्णकर हे पोहोचू सकले नाहीत. त्यांनी पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना दिली होती. मोन्सेरात यांनी अलिकडे पक्षाच्या बहुतेक कार्यक्रमांपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. असे पक्षात बोलले जाते.
तिकीट दिल्लीत ठरणार....
भापजच्या या चिंतन शिबिरात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चिंतन शिबिरात उमेदवारीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली असून उमेदवारीचा निर्णय माव दिल्लीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.