खाणग्रस्तांसाठी 93 कोटींचा निधी वापरा, कृती योजना सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:55 PM2019-06-27T21:55:30+5:302019-06-27T21:55:36+5:30
पणजी : राज्यातील खाणग्रस्त भागांमध्ये खनिज खाण अवलंबितांसाठी जिल्हा मिनरल निधीतून पैसा वापरता येतो पण अजुनही 93 कोटींचा निधी ...
पणजी : राज्यातील खाणग्रस्त भागांमध्ये खनिज खाण अवलंबितांसाठी जिल्हा मिनरल निधीतून पैसा वापरता येतो पण अजुनही 93 कोटींचा निधी पडून आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निधी खाण अवलंबितांच्या सेवेसाठी वापरा अशी सूचना जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिका:यांना गुरुवारी केली. तसेच निधीच्या वापरासाठी वार्षिक कृती योजना आपल्याला सादर करा अशीही सूचना त्यांनी जिल्हाधिका:यांना केली.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी जिल्हा मिनरल फाऊंडेशनची बैठक घेतली. दोन्ही जिल्हाधिकारी तसेच खाण खात्याचे संचालक श्री. आपटे आणि चार आमदारांनी बैठकीत भाग घेतला. आमदार प्रसाद गावकर, जोशुआ डिसोझा, ग्लेन तिकलो, कालरुस आल्मेदा हे उपस्थित राहिले. जिल्हा मिनरल निधीत एकूण 187 कोटी रुपये आहेत. यापैकी 93 कोटी रुपये येत्या मार्चर्पयत म्हणजे या आर्थिक वर्षात वापरता येतात. खाणग्रस्त भागांमध्ये खनिज खाण अवलंबितांना पिण्याचे पाणी पुरविणो, विद्याथ्र्याना वाहतुकीची सोय करणो, शेत जमिनींमध्ये साठलेली माती काढून टाकून शेतक:यांना दिलासा देणो, खाण अवलंबितांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणो अशा कामांसाठी जिल्हा मिनरल निधी वापरता येतो. आतार्पयत फारच कमी प्रमाणात निधी वापरण्यात जिल्हाधिका:यांना व संबंधित समित्यांना यश आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. किती योजना व उपक्रम खाण अवलंबितांसाठी खनिजग्रस्त भागांमध्ये राबविले जात आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिका:यांकडून जाणून घेतली. अजून बराच निधी वापरणो शिल्लक आहे. पुढील नऊ महिन्यांत पन्नास टक्के निधी म्हणजे 93 कोटी रुपये वापरता येतात. अनेक ग्रामपंचायती व आमदारांनीही आपले प्रस्ताव यापूर्वी सरकारला दिलेले आहेत. तथापि, जास्त निधी खर्च होणो गरजेचे आहे. त्यासाठी मुळात कृती योजना तयार असायला हवी. जिल्हाधिका:यांकडे तशी योजना नाही. पुढील महिन्याभरात ती तयार करावी असे ठरले आहे.