बदलत्या हवामानासाठी साेलार एनर्जीचा वापर गरजेचा, त्याने पर्यावरणाची बचत: मंत्री शिराेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:57 PM2024-01-18T14:57:36+5:302024-01-18T14:57:59+5:30

आम्ही २०४७चा विकसित भारत आतापासून तयार करु शकतो, असेही ते म्हणाले

Use of solar energy is necessary for changing climate says Minister Subhash Shiredkar | बदलत्या हवामानासाठी साेलार एनर्जीचा वापर गरजेचा, त्याने पर्यावरणाची बचत: मंत्री शिराेडकर

बदलत्या हवामानासाठी साेलार एनर्जीचा वापर गरजेचा, त्याने पर्यावरणाची बचत: मंत्री शिराेडकर

नारायण गावस, पणजी गोवा: लाेकांनी बदलत्या हवामानाचा विचार करत प्रत्येकाने साेलार एनर्जीचा वापर केला पाहीजे. तरच पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. राज्यात आता काही वर्षात हळूहळू प्रत्येकाच्या घरी साेलार पॅनल असणार आहे, असे जलस्त्राेत मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.

पणजीत सुरु असलेल्या रिस्टार्ट एनर्जी इंडिया एक्स्पो ते बाेलत होते. पंतप्रधानांचा २०४७ विकसित भारत आतापासून तयार झाला पाहिजे. यासाठी इंधनाच्या वापरापेक्षा सोलार यंत्राचा वापर व्हायला हवा. आमच्यासाठी सूर्य ही सर्वात माेठी शक्ती आहे त्याचा आपण हवा तेवढा वापर तसेच फायदा करुन घेऊ शकतो. गाेव्यासारख्या आमच्या लहान राज्यात याचा जास्त फायदा होऊ शकतो. वाढत्या इंधनामुळे आता साेलारच्या गाड्यांना तसेच सोलारच्या इतर यंत्रांना मागणीही वाढणार आहे. तसेच लोकांनी आपल्या घरी विजेचा वापर कमी करण्यासाठी साेलार पेनल बसविले पाहिजे. यामुळे पर्यावरणाचे जतनही हाेऊ शकते तसेच बचतही होऊ शकते, असेही मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

राज्यातील सर्व पंचायतीच्या सरपंच तसेच पंच सदस्यांनी अशा एक्स्पोमध्ये सहभागी हाेत अशा साेलार उपकरणाची माहिती जाणून घ्यावी तसेच आपल्या गावातील लाेकांना या विषयी माहिती देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. आता बदलत्या पर्यावरणाचा तसेच वातावरण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊन अशा प्रकारच्या सोलार उपकरणांचा वापर करावा. तरच आम्ही २०४७ चा विकसित भारत आतापासून तयार करु शकतो, असेही मंत्री शिराेडकर म्हणाले. .

 

Web Title: Use of solar energy is necessary for changing climate says Minister Subhash Shiredkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.