प्लास्टिकचा वापर टाळावा; गोव्यात चर्च संस्थेचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:57 PM2019-10-31T12:57:37+5:302019-10-31T12:57:48+5:30

कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस या चर्च संस्थेने धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा असा फतवा काढला आहे.

The use of plastic should be avoided; Fatwa of a church organization in Goa | प्लास्टिकचा वापर टाळावा; गोव्यात चर्च संस्थेचा फतवा

प्लास्टिकचा वापर टाळावा; गोव्यात चर्च संस्थेचा फतवा

Next

पणजी : कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस या चर्च संस्थेने धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा असा फतवा काढला आहे. प्लास्टिक पिशव्यांबरोबरच प्लास्टिक प्लेटस्, स्ट्रॉ, टेट्रा पॅक्स वापरू नयेत असे बजावले आहे. धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचाचा वापर केला जावा. नॉन बायोडिग्रेडेबल वस्तू वापरू नयेत.

एकदाचा वापर करून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक प्लेटस तसेच स्ट्रॉ वगैरे वापरू नयेत. एकादी व्यक्ती मयत झाल्यानंतर महिन्याच्या दिवशी लोक संबंधिताच्या नातेवाईकांच्या घरी भेट देत असतात अशा वेळी रिफ्रेशमेंटसाठी प्लास्टिक बशा वापरल्या जातात. चर्चमध्ये बैठका होतात किंवा सेमिनार अथवा अन्य कार्यक्रमांच्यावेळीही प्लास्टिक वस्तू वापरल्या जातात त्या वापरु नयेत, असे बजावण्यात आले आहे.

प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल व विषारी असते त्यामुळे वापर करु नये असे या फतव्यात म्हटले आहे. प्रदूषण करणारे डेकोरेशनचे साहित्य खरेदी न करता हेच पैसे आर्चडायोसिस आॅफ गोवा दमण अ‍ॅण्ड दिव या संस्थेला देणगी म्हणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यासाठी चर्चच्या नेत्यांनी लोकांना प्रबोधन करावे, असे निर्देश दिले आहेत.

Web Title: The use of plastic should be avoided; Fatwa of a church organization in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.