गोव्यात परशुरामांविषयी अपशब्द वापरले; आरोपीला सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:00 PM2020-03-02T23:00:03+5:302020-03-02T23:00:08+5:30
शनिवारी दांडो - बाणावली येथे नागरिकत्व कायदयाच्या विरोधात सभा होती.
मडगाव: नागरिकत्व कायदयाच्या विरोधात गोव्यातील बाणावली येथे आयोजित सभेत भगवान परशुरामांविषयी अपशब्द वापरल्याने धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या रामकृष्ण जल्मी याची आज सोमवारी न्यायालयाने सर्शत जामिनावर सुटका केली. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधिक्ष शिल्पा पंडीत यांच्या न्यायालयाने या संशयिताला दहा हजार व तितक्याच रक्कमेचा एक हमिदार व गुन्हा अन्वेषण विभागात सात दिवस हजेरी लावणे आदी अटीवर त्याला हा जामीन मंजूर झाला.
दरम्यान, जल्मी याच्याविरुध्द गोव्यातील फातोर्डा व कुंकळळी पोलीस ठाण्यातही वरील स्वरुपाच्या तक्रारी नोंद झाल्या आहे. फातोर्डा पोलीस ठाण्यात शौमिक आंगले यांनी तक्रार नोंदविली आहे.
शनिवारी दांडो - बाणावली येथे नागरिकत्व कायदयाच्या विरोधात सभा होती. पीपल्स फोरम फॉर जस्टीस , सेक्युलरिझम आणि डेमोक्रसी यांनी या सभेचे आयोजन केले होते. यात रामकृष्ण जल्मी याने भगवान परशुरामविषयी अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. यासंबधी विविध ठिकाणांहून अनेक धार्मिक संस्थांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात जल्मी याच्याविरोधात तक्रार नोंदविली होती. रविवारी रात्री त्याला गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेउन अटक केली होती.