म्हादईचे पाणी वळविण्यास उसगावचा विरोध, ठराव संमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:36 PM2023-02-20T14:36:48+5:302023-02-20T14:37:18+5:30

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळविण्यास विरोध करणारा ठराव उसगावच्या ग्रामसभेत घेण्यात आला.

usgaon opposition to diversion of Mhadei water resolution passed | म्हादईचे पाणी वळविण्यास उसगावचा विरोध, ठराव संमत

म्हादईचे पाणी वळविण्यास उसगावचा विरोध, ठराव संमत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव: म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळविण्यास विरोध करणारा ठराव उसगावच्या ग्रामसभेत रविवारी रोजी घेण्यात आला. म्हादई ही राज्याची जीवनदायिनी असल्याने तिचे पाणी कर्नाटकमध्ये वळविणे गोव्यातील गावांसाठी धोकादायक असल्याचे मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले. केंद्र सरकारने कर्नाटकला दिलेली डीपीआर मंजुरी मागे घ्यावी. व म्हादई नदीचे पाणी वळवू नये, असा ठराव करण्यात आला. उसगाव पंचायतीचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंचायत सचिव प्रसाद शेट, पंच सदस्य गोविंद परब फात्रेकर, संजय उर्फ प्रकाश गावडे, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्स, वैभवी गावडे, रेश्मा मटकर उपस्थित होत्या.

उसगाव गांजे पंचायत क्षेत्रातील ११ प्रभागांत प्रत्येकी एक सार्वजनिक नळजोडणी देण्यात यावी. असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. पंचायत क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांमध्ये स्थानिक युवक, युवती आणि महिलांना प्रथम रोजगार प्राधान्य देण्यात यावा. भागातील औद्योगिक आस्थापनांमध्ये ठेकेदारीअंतर्गत काम करणाऱ्या स्थानिक महिला कामगारांना नियमित रोजगार प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अशा मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या. स्थानिकांना हवे रोजगार प्राधान्य ह्या विषयावरून ग्रामसभेत काहींनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे वातावरण तापले. सरपंच नरेंद्र गावकर, पंच सदस्य गोविंद परब फात्रेकर, संजय उर्फ प्रकाश गावडे, विनोद मास्कारेन्स यांनी योग्य प्रकारे हाताळले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: usgaon opposition to diversion of Mhadei water resolution passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा