युगोडेपाने घेतला सावध पवित्रा
By admin | Published: May 7, 2016 02:49 AM2016-05-07T02:49:00+5:302016-05-07T02:51:37+5:30
मडगाव : बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्यामुळे आता युगोडेपाच्या पवित्र्यात बदल झाला असून सध्या
मडगाव : बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविल्यामुळे आता युगोडेपाच्या पवित्र्यात बदल झाला असून सध्या तरी या पक्षाने तटस्थ भूमिका घेण्याचे ठरविले आहे. मोन्सेरात यांना पक्षात स्थान देऊ नये, अशी भूमिका एका गटाने व्यक्त केली असताना दुसऱ्या बाजूने या प्रकरणाचा निवाडा काय लागेल, याकडे काही नेत्यांचे लक्ष लागले आहे.
चेन्नईहून शुक्रवारी गोव्यात पोहोचलेले युगोडेपाचे उपाध्यक्ष व प्रवक्ते राधाराव ग्रासियस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मोन्सेरात हे काँग्रेसचे असंलग्न आमदार असून ते युगोडेपाचे भाग नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षात घेणे अथवा न घेणे हा प्रश्न सध्या उद्भवत नाही. मात्र, मोन्सेरात यांच्यावर जो गुन्हा नोंद झाला आहे, त्याबद्दलही आम्हाला शंका आहे. भाजप सरकारवर आमचा विश्वास नाही. हे सरकार कुणालाही कुठल्याही गुन्ह्यात अडकवू शकते. तरुण तेजपाल प्रकरण हे यातील उत्तम उदाहरण आहे.