वालंकणी रेल्वे तिकीट वाढ जातीय अजेंड्यामुळे - प्रदेश कॉंग्रेसचा केंद्रावर आरोप

By admin | Published: August 29, 2016 04:45 PM2016-08-29T16:45:40+5:302016-08-29T16:45:40+5:30

वालंकणी फेस्ताच्या निमित्ताने विशेष रेलगाड्या सोडतानाच तिकीट 300 पटींनी वाढवून केंद्र सरकारने आपला जातीय अजेंडा पुढे रेटला असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला आहे.

Valankani railway ticket increase due to caste agenda - The center of the Congress Congress alleged | वालंकणी रेल्वे तिकीट वाढ जातीय अजेंड्यामुळे - प्रदेश कॉंग्रेसचा केंद्रावर आरोप

वालंकणी रेल्वे तिकीट वाढ जातीय अजेंड्यामुळे - प्रदेश कॉंग्रेसचा केंद्रावर आरोप

Next

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 29  -  वालंकणी फेस्ताच्या निमित्ताने विशेष रेलगाड्या सोडतानाच तिकीट 300 पटींनी वाढवून केंद्र  सरकारने आपला  जातीय अजेंडा पुढे रेटला असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केला आहे. 

ट्रॉजन यांनी सांगितले की वालांकणी फेस्तला गोव्यातून हजारो भाविक जात असतात. भाविकांची सोय व्हावी यासाठी ममता बँनर्जी रेल्वेमंत्री असताना कॉंग्रसने विशेष मेहनत घेतली होती. यंदा रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी आणखी विशेष सुविधा दिल्या असल्या तरी भरमसाठ भाडेवाढ करून या जत्रेला गोव्यातून कुणी जावूच नयेत याची खबरदारी घेतली आहे. 500 ते 550 रुपये पयर्यंत असलेली रेल्वेची तिकीट 2 हजार रुपयांपर्यंत वाढवून सामान्य माणसाला निराश केले आहे. भाजपच्या जातीय अजेंडाचा हा एक भाग असून गोवा सरकारही या बाबतीत मौन बाळगून आहे.  एवढेच नव्हे तर भाजपचे अल्पसंख्याक आमदारही या बाबतीत मुग गिळून आहेत असे ते म्हणाले.  सरकारच्या या कृतीचा कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवा  सरकारने आणि भाजपमधील अल्पसंख्याक समुदायाच्या आमदारांनीही याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 
हा प्रकार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्याचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यात माध्यम मुद्यावर भाजप सरकार आणि संघाचे मतभेद असल्याचे जरी दाखविण्यात येत असले तरी संघ आणि भाजप एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती सल्याचे त्यांनी सांगितले. भाजप विरोधी मते विभागण्यासाठी हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Valankani railway ticket increase due to caste agenda - The center of the Congress Congress alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.