अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम
By पंकज शेट्ये | Published: November 13, 2023 05:25 PM2023-11-13T17:25:56+5:302023-11-13T17:26:35+5:30
तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले.
वास्को : दिवाळीच्या एका रात्रीपूर्वी (शनिवारी) वास्कोत आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले. दुसरे बक्षीस मडर्क येथील मंगलमूर्ती युवासंघ यांनी तर तिसरे बक्षीस सडा मुरगाव येथील शिवराज ग्रुप यांनी पटकाविले. चौथे बक्षीस कुठ्ठाळी येथील मालगुडी बॉईज यांना प्राप्त झाले.
मुरगाव नगरपालिका इमारतीसमोर आयोजीत तिसरी अखिल गोवा पातळीवर मिनी नरकासूर वध स्पर्धेचे पहिले उत्तेजनार्थ बक्षीस श्री गजानन युवा बोगदेश्वर मुरगाव, बोगदा यांना तर दुसरे उत्तेजनार्थ युवा मंडळ व्होळांत वास्को यांना मिळाले. स्पर्धेचे तिसरे उत्तेजनार्थ शिवंभा बाळकृष्ण मंडळ आडपई फोंडा यांना मिळाले असून चौथे सडा, मुरगाव येथील त्रिमूर्ती संघाला मिळाले. पाचवे उत्तेजनार्थ नवेवाडे, वास्को येथील शिव दामोदर यांना प्राप्त झाले. उत्कृष्ट श्री कृष्ण रियांश, रिदम, आरंश व श्री गजानन युवा बोगदेश्वर बोगदा मुरगाव यांना प्राप्त झाले. बक्षिस वितरण समारंभाला व्यासपिठावर दक्षिण गोवा माजी खासदार अँड. नरेंद्र सावईकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक अमय चोपडेकर, यतिन कामुर्लेकर, विनोद किनळेकर, देविता आरोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.