माजी मंत्री मोन्सेरात संशयित असलेल्या बलात्कार प्रकरणातील पिडीत युवती गुढरित्या गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 06:36 PM2019-05-13T18:36:29+5:302019-05-13T18:36:52+5:30

पोलीसात अपहरणाचा गुन्हा नोंद: 28 एप्रिलला सकाळच्या वेळेस कॉन्वेंटमधून बाहेर पडली, अजुनही सापडेना

VICTIM IN ALLEGED RAPE CASE INVOLVING X-MINISTER BABUSH MONSERRATTE IS MISSING | माजी मंत्री मोन्सेरात संशयित असलेल्या बलात्कार प्रकरणातील पिडीत युवती गुढरित्या गायब

माजी मंत्री मोन्सेरात संशयित असलेल्या बलात्कार प्रकरणातील पिडीत युवती गुढरित्या गायब

googlenewsNext

- सुशांत कुंकळयेकर


मडगाव: माजी मंत्री आणि सध्या पणजीच्या विधानसभा पोट निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार असलेले बाबुश मोंसेरात यांच्या विरोधात दाखल केल्या गेलेल्या कथित बलात्कार प्रकरणातील पीडीत युवती दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंटच्या हॉस्टेलमधून  गायब झाल्याने खळबळ माजली आहे. राज्याच्या महिला व बाल कल्याण खात्याने या घटनेची गंभीर दखल घेताना या प्रकरणात तपास करणा:या वेर्णा पोलिसांकडून स्थिती अहवाल मागितला आहे. सध्या वेर्णा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.


    पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो 28 एप्रिल पासून सदर मुलगी गायब झाली असून सदर कॉन्वेंटच्या नन्सनी यामुळे पोलीसस्थानकात तक्रार दिली असून  सदर मुलीला कुणीतरी भुलवून  गायब केले असावे असा संशय व्यक्त केला आहे. 


माजी शिक्षणमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्यावर 2016 साली त्यांच्या आस्थापनात काम करणा:या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. सदर मुलीला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या महिला विभागाने मोन्सेरात यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. मागच्या आठवडय़ात या प्रकरणात आरोप निश्र्चितीपूर्वीची सुनावणी झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. अशी पाश्र्र्वभूमी असतानाच आता या प्रकरणातील पीडित युवतीच गायब झाल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण लाभले आहे.


     मिळालेल्या माहितीप्रमाणो, या कथित बलात्काराच्या प्रकरणानंतर  सदर मुलीला अपना घरमध्ये ठेवण्यात आले होते. अपना घरमधून तिला शिक्षणासाठी दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंट हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले होते. या कॉन्वेंटमध्ये ती फॅशन डिझायनींगचा कोर्स करत असे. 27 एप्रिल रोजी सकाळी ती हॉस्टेलमधून अचानक गायब झाली होती. मात्र रात्री 9च्या सुमारास  तिला कुणीतरी मोटरसायकलवरुन पुन्हा हॉस्टेलमध्ये आणून सोडले होते. 28 एप्रिल रोजी कॉन्वेंटमधील सगळया नन्स रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या असता सदर मुलीने दोन बॅगात आपले कपडे भरुन आपण परत अपना घरमध्ये जाते असे सांगून कॉन्वेंटमधून ती बाहेर पडली होती. मात्र नंतर चौकशी केली असता ती अपना घरमध्ये गेलीच नाही अशी माहिती मिळाली होती. यानंतर  कॉन्वेंटमधून सदर मुलगी नाहीशी झाल्याची वर्दी  पोलीस स्थानकात देण्यात आली होती.  मात्र या संदर्भात रितसर तक्रार देण्यात आली नव्हती. 


   पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, यापूर्वी या मुलीने अशाच प्रकारे चारवेळा हॉस्टेल सोडले होते. मात्र लगेच दुस:या किंवा तिस:या दिवशी ती परत आली होती. यावेळीही तसेच घडेल या अपेक्षेने कॉन्वेंटमधून तिची वाट पाहिली गेली. मात्र  सुमारे आठ दिवस उलटूनही ती परत न आल्याने शेवटी तक्रार नोंदविण्यात आली. 


 आतार्पयत पोलीसानी केलेल्या तपासात ज्या 28 एप्रिल रोजी  सदर मुलगी कॉन्वेंटमधून नाहीशी झाली त्या सकाळी ती एका बसवर बसून  वास्क ोच्या दिशेने निघाली होती. मात्र  ती बस वास्कोला जात नसल्यामुळे ती क्विनी नगरला उतरली होती. या घटनेपूर्वी सदर मुलगी काहीशी दडपणाखाली वावरत होती. त्याच दडपणाखाली तिने आपली तोंडी परिक्षा दिली होती. मात्र प्रात्यक्षिक परिक्षा दिली नव्हती. या प्रकरणात पोलीस सर्व बाजूनी तपास करीत आहेत अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

 अपहरणाचा बाबूश केसशी संबंध?
या अपहरणाचा सध्या गाजत असलेल्या बाबुश प्रकरणाशी संबंध तर नसावा ना अशी चर्चा चालू झाली आहे. या संदर्भात माहिती देताना  बायलांचो एकवोट यासंघटनेच्या आवदा व्हिएगश  यांनी ज्या दिवशी या मुलीने हॉस्टेल सोडले त्याच्या आदल्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्रवर बाबुश बलात्कार प्रकरणासंदर्भात  वृत्त आले होते. त्यानंतरच ती मुलगी गायब झाली. कदाचित हे वृत्त वाचून दबावाखाली येऊन तिने पलायन केले की कुणी तरी तिच्यावर दडपण आणून  तिचे अपहरण केले याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यानी व्यक्त केली.
या प्रकरणात बाल कल्याण समितीनेही लक्ष घातले असून या समितीच्या सदस्यांनी वेर्णा पोलिसांशी संपर्क साधून तपास कुठे पोहोचला आहे याची चौकशी केली.


 

Web Title: VICTIM IN ALLEGED RAPE CASE INVOLVING X-MINISTER BABUSH MONSERRATTE IS MISSING

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.