VIDEO: गोव्यामध्ये रेल्वेवर दरड कोसळून दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली संपूर्ण ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:01 AM2021-07-24T08:01:29+5:302021-07-24T08:04:36+5:30

Goa Train Landslide Incident: गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. हा मुसळधार पाऊस आणि पुराचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे.

VIDEO: Landslides on Train in Goa, train derailed between Dudhsagar and Sonalim | VIDEO: गोव्यामध्ये रेल्वेवर दरड कोसळून दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली संपूर्ण ट्रेन

VIDEO: गोव्यामध्ये रेल्वेवर दरड कोसळून दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली संपूर्ण ट्रेन

googlenewsNext

मुंबई/पणजी - गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. हा मुसळधार पाऊस आणि पुराचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे. कोकणातील विविध गावांत भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. तर या भूस्खलनाचा रेल्वेलाही फटका बसला आहे. (Goa Train Landslide Incident) गोव्यामध्ये मंगळुरूकडून मुंबईकडे येणाऱ्या एका ट्रेनवरच दरड कोसळली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली ही गाडी सापडली आहे. ( Landslides on Train in Goa, train derailed between Dudhsagar and Sonalim)

शुक्रवारी कर्नाटकमधील मंगळुरू येथून मुंबईकडे येणारी ही गाडी अपघाताची शिकार झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार रेल्वे रुळावरून उतरण्याची ही घटना दुधसागर-सोनोलिम विभागात घडली आहे. मिळत असलेल्या माहितीमध्ये अपघातग्रस्त ट्रेनची ओळख ०११३४ मंगळुरू जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या रूपात झाली आहे. विशेष बाब म्हणजे चिपळूण येथे आलेल्या पुरामुळे या रेल्वेच्या मार्गाण्त बदल करून ती मडगाव-मिरजमार्गे वळवण्यात आली होती. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे. दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनांदरम्यान दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी डिव्हिजनच्या घाट विभागात दोन ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. 

याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारी दिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेन नंबर ०८०४८ वास्को द गामा-हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा-तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्को द गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.  

Web Title: VIDEO: Landslides on Train in Goa, train derailed between Dudhsagar and Sonalim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.