“रोजगार देण्यास गोवा सरकार अपयशी, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:51 PM2023-02-12T12:51:30+5:302023-02-12T12:53:46+5:30
बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई केला आहे. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यात सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात बेरोजगारी वाढली असल्याचे सांगितले.
तथा फातोड्यांचे सरदेसाई यांनी बेरोजगारांचे तपशीलवार आकडेही त्यांनी यावेळी सांगितले. सेंट्रल फॉर मॉनिटरी इकॉनमीच्या आकडेवारीनुसार गोव्यात बेरोजगारांची टक्केवारी १६.०२ टक्के इतकी आहे. यामध्ये ६५ टक्के घटक ३५ वयोगटाखालील आहे. बेराजगारीमुळे उद्रेक होण्याचा धोका असतो. सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे दूरदृष्टी असायला हवी. सरकारने रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात १४ हजार अर्ज आले होते. प्रत्यक्षात मात्र ५५७ जणांना ऑफर लेटर मिळाले. हे सरकार निष्काळजी असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला.
जर स्थिती अशीच राहिली तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या राज्यात गरीब दिवसेगणिक गरीब होत चालला आहे. तर श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे. गोव्याचे भवितव्य पुढे काय होणार याच्याशी सरकारला काहीही वाटत नाही.
महिलांना रोजगार उपलब्ध करून देताना सुरक्षा व वाहतूक व्यवस्था पुरवली पाहिजे. आज गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील लोक पोतुर्गीज पासपोर्ट घेऊन परदेशात जात आहेत. त्यांना देशद्रोही संबोधले जाते. सरकारने रोजगार योजना अधिसूचित केली पाहिजे, मोपा विमानतळावर किती गोवेकरांना नोकरी मिळाली, याची आकडेवारी आहे का असा सवालही त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"