गोव्यातल्या विजय माल्यांचा बंगला बँकांनी घेतला ताब्यात
By admin | Published: May 13, 2016 06:27 PM2016-05-13T18:27:28+5:302016-05-13T19:03:04+5:30
विजय माल्या यांचा गोव्यातल्या कंडोलिम इथला किंगफिशर व्हिला कर्ज दिलेल्या बँकांच्या वतीने एसबीआय कॅपिटलने ताब्यात घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 13 - विजय माल्या यांचा गोव्यातल्या कंडोलिम इथला किंगफिशर व्हिला कर्ज दिलेल्या बँकांच्या वतीने एसबीआय कॅपिटलने ताब्यात घेतला आहे. बुधवारी उत्तर गोव्याचे तहसीलदार व जिल्हा न्यायाधीश नीला मोहनन यांनी किंगफिशर व्हिला ताब्यात घेण्याची बँकांना अनुमती दिली होती.
या आलिशान बंगल्याची किंमत 90 कोटी रुपये असून गोव्यामध्ये बड्या सेलिब्रिटींना पार्ट्या देण्यासाठी या बंगल्याचा वापर माल्या करत असत. एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी व्हिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्यांनी बंगल्यातल्या सगळ्या सामानाची नोंद केली आहे, यामध्ये गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आदींचा समावेश आहे.
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेल्या माल्यांच्या या बंगल्याचा ताबा मिळावा अशी मागणी बँकांच्या समूहाच्या वतीने स्टेट बँकेने केली होती.
बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेले किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख विजय माल्या हे नुसते पसार जाले नाहीत, तर ते 275 कोटी रुपयांसह इंग्लंडला गेल्याचे समोर आले आहे.
ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा...