विनोद तावडे गोव्याचे नवे भाजप प्रभारी? लोकसभा निवडणुकीमुळे वर्णी लागणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:43 AM2023-07-31T08:43:21+5:302023-07-31T08:45:25+5:30
प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपने सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून हटवल्याने त्यांचे गोवा प्रभारीपदही गेल्यात जमा आहे. नवीन प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची वर्णी लागू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने पक्षाला गोव्यासाठी नवा प्रभारी लवकर द्यावा लागेल. तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री असून, त्यांना गोव्याचा कोपरान् कोपरा ठाऊक आहे. यापूर्वी त्यांनी गोव्यात कामही केलेले आहे. त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने गोव्याचे प्रभारीपद त्यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रदेश भाजप राज्य कार्यकारिणीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला. तो पुढे म्हणाला की, सी.टी.रवी यांना प्रभारीपदावरून हटवल्याचे अधिकृत पत्र प्रदेश भाजपला अजून आलेले परंतु ज्या अर्थी सरचिटणीसपदावरून हटवले, त्याअर्थी सी. टी. रवी यांचे प्रभारीपदही गेल्यात जमा आहे.
तावडे हे अभाविपच्या मुशीत घडलेले आहेत. अलीकडेच अभाविपच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते शेजारी राज्यात असल्याने त्यांचे गोव्यात पूर्वीपासून येणे-जाणे आहे प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्यावेळ ते गोव्यात आलेले आहेत. भाजपच अनेक आमदार, मंत्री, पदाधिकारी कार्यकर्त्यांना ते जवळून ओळखतात सी. टी. रवी हे पक्षाचे राष्ट्रीय महामंत्र बी. एल. संतोष यांच्या खास विश्वासातील होते. परंतु आता रव यांना सरचिटणीसपदावरून दू केल्याने गोव्यासाठी नवीन प्रभारी द्यावा लागेल.