'विर्डी'वरून अन्याय होणार नाही; शिंदे गटाची गोवेकरांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:12 AM2023-04-12T09:12:59+5:302023-04-12T09:15:29+5:30
विर्डी धरणावरून गोवा व महाराष्ट्रमध्ये वाद सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विर्डी धरणावरून गोवा व महाराष्ट्रमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्राने या धरणाचे काम हाती घेतल्याने त्याला विरोधही केला. या दोन्ही राज्यांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळे विर्डी धरणाच्या विषयावरून गोव्यावर अन्याय होणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर भाजप सरकारशी चांगले नाते असल्याचेही आनंदराव अडसुळ यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गोव्यात प्रवेश केला आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने प्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवली जाईल. काही महत्त्वाचे राजकीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील, असे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथे शिवसेना ३० वर्षांपासून आहे. राजकीय स्तरावर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा नव्यास्वरुपात दाखल होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी असून येथूनही निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे सागून अडसुळ म्हणाले की, महाराष्ट्रा मुख्यमंत्री शिंदे हे दिवसाला १८ ते २० तास काम करतात. रात्री उशिराही ते कार्यकर्त्यांना भेटतात.
गोव्यात जे ३० वर्षांत घडले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवण्याचा प्रयत्न करू. पक्ष विस्ताराच्या दृष्टीनेच सुप्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवली जाईल, असेही म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"