जर गुन्हा केला असेल तर भावाला पाठिंबा नाही; आमदार वीरेश बोरकर यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:19 AM2023-11-27T10:19:57+5:302023-11-27T10:21:13+5:30

एका महिलेचा पाठलाग केल्याचा व घरात घुसून मारहाण केल्याचा साईशसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

viresh borkar said if crime is committed the brother is not supported | जर गुन्हा केला असेल तर भावाला पाठिंबा नाही; आमदार वीरेश बोरकर यांची स्पष्टोक्ती

जर गुन्हा केला असेल तर भावाला पाठिंबा नाही; आमदार वीरेश बोरकर यांची स्पष्टोक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'माझ्या भावाने जर गुन्हा केला असेल तर तो केवळ माझा भाऊ आहे या कारणासाठी मी त्याला पाठिंबा देणार नाही,' असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. आपला भाऊ साईश बोरकर याच्याविरुद्ध पोलिसात नोंदविलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका महिलेचा पाठलाग केल्याचा व घरात घुसून मारहाण केल्याचा साईशसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

आमदार बोरकर यांचा भाऊ साईश याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बोरकर याच्याविरुद्ध आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षावर टीका केली जात होती. मात्र, साईश याच्या प्रकरणापासून आमदार बोरकर यांनी स्वतःला वेगळे केले आहे. याबाबत जारी केलेल्या एका व्हिडीओत ते म्हणतात की, 'या घटनेमुळे मी स्वतः आणि माझे कुटुंबीयही दुखावले गेलो आहोत. मी स्वत: कायद्याचा सन्मान करतो. त्यामुळे माझ्या भावाने कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याबाबतीत पोलिस तपासात मी कोणताच हस्तक्षेप करणार नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणतात की, 'माझ्या मतदारांनीही याबाबत संकोच बाळगू नये, तसेच आरजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही कोणताही संदेह बाळगू नये. माझी भूमिका स्पष्ट आहे.' दरम्यान, महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याप्रकरणी साईशसह तिघांविरुद्ध आगशी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. साईश याच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या खासगी मालमत्तेत घुसण्याचा आणि तक्रारदार महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा ठपका आहे. साईशविरुद्ध भादंसं कलम ५०४, ३२३, ५०६, ४४७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

Web Title: viresh borkar said if crime is committed the brother is not supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.