व्हिसा उल्लंघन प्रकरण : ६ इंडोनेशियन महिलांना ३१ आॅक्टोबरपर्यंत दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:31 PM2018-10-17T20:31:56+5:302018-10-17T22:13:47+5:30

व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपर्यंत देशात राहण्याची परवानगी दिली आहे. 

Visa Infringement Case: 6 Indogation Remedies to Women by 31 October | व्हिसा उल्लंघन प्रकरण : ६ इंडोनेशियन महिलांना ३१ आॅक्टोबरपर्यंत दिलासा

व्हिसा उल्लंघन प्रकरण : ६ इंडोनेशियन महिलांना ३१ आॅक्टोबरपर्यंत दिलासा

Next

पणजी - व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपर्यंत देशात राहण्याची परवानगी दिली आहे. 

गोव्यात वैद्यकीय कंपनीत प्रशिक्षक म्हणून नोकरीसाठी व्हिसा घेून आलेल्या ६ इंडोनेशियाच्या महिलांना गोवा पोलिसांच्या विदेश विभागाने देश सोडण्यासाठी नोटीस बजावली होती. व्हिसाचे नियम या महिलांकडून उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका त्यांचयावर ठेवण्यात आला होता. या महिलांकडून त्यांच्या गोव़्यातील वास्तव्याची माहिती कायद्यानुसार १४ दिवसांत विदेश विभागाला देणे आवशक होती. परंतु त्यांनी तसे केले नाही.  या शिवाय या महिला वैद्यकीय कंपनीत काम करण्याच्या कंत्राटावर आल्या होत्या, परंतु त्या स्पामध्ये मसाज देण्याचेही काम करीत होत्या असे आढळून आले आहे. हेही व्हिसा नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे त्यांना विदेश विभागाने देश सोडण्यास सांगितले होते. या प्रकरणात या युवतीनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने या प्रकरणात पुन्हा विदेश विभागाकडे जाण्याची सूचना त्यांना केली होती. विदेश विभागाने या प्रकरणात पुन्हा सुनावणी घेतली होती, परंतु आदेशात बदल केला नाही. त्यामुळे या युवतीना देश सोडणे भाग आहे. त्यासाठी त्यांना १८ आॅक्टोबरपर्यंत मूदत देण्यात आली होती. परंतु खंडपीठाने ती वाढवून आता ३१ आॅक्टोबर केली आहे. 

विदेश विभागाच्या आदेशानंतर या सहा महिलांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत त्या महिलांनी आपली चूकही मान्य केली आहे, परंतु विदेश विभागासमोर स्पष्टीकरण देण्याची संदी देण्याची आणि या विभागाला आपल्या निर्णयाच्या बाबत फेर विचार करण्याची मागणी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती एन एम जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना दिलासा देताना विदेश विभागाला या प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी घेऊन काय तो निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Visa Infringement Case: 6 Indogation Remedies to Women by 31 October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.