आरोग्यमंत्र्यांवर विश्वजीतचा निशाणा
By admin | Published: July 30, 2016 02:49 AM2016-07-30T02:49:02+5:302016-07-30T02:51:58+5:30
पणजी : साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या साई इन्स्टिट्यूटला भाडेपट्टीवर
पणजी : साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या साई इन्स्टिट्यूटला भाडेपट्टीवर देताना कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेलेली नाहीत, असा घणाघाती आरोप करून आमदार विश्वजीत राणे यांनी आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर शुक्रवारी प्रश्नांच्या फैरी झाडून त्यांना अक्षरश: घेरले.
या प्रकरणात केंद्रीय दक्षता आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेलेली नसून निव्वळ वशिलेबाजी झालेली आहे, असा थेट आरोप विश्वजीत यांनी केला. माजी अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही याबाबतीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे मान्य केलेले आहे. सरकारी मालमत्ता मर्जीनुसार अशा लाटल्याच कशा जातात, असा सवाल विश्वजीत यांनी केला. अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही या बाबतीत स्पर्धा कायद्याचा भंग झाला असल्याचा आरोप केला.
ही इमारत सार्वजनिक बांधकाम खात्याने ठरवून दिलेल्या भाड्यानुसारच संस्थेला दिलेली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले; परंतु या उत्तराने समाधान न झाल्याने विश्वजीत यांनी (पान ४ वर)