पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 12:39 PM2018-06-24T12:39:00+5:302018-06-24T12:39:11+5:30

गोव्यातील किना-यांवर खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांचे जीव गमावण्याचे प्रकार वाढल्याने सरकारने गंभीर दखल घेत अशी 24 धोकादायक ठिकाणे अधिसूचित केली असून या असुरक्षित ठिकाणी यापुढे सेल्फी घेण्यास मनाई असेल. 

Visitors, beware of 'these' 24 unsafe places in Goa! Forbidden to take selfie | पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई 

पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई 

Next

पणजी : गोव्यातील किना-यांवर खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांचे जीव गमावण्याचे प्रकार वाढल्याने सरकारने गंभीर दखल घेत अशी 24 धोकादायक ठिकाणे अधिसूचित केली असून या असुरक्षित ठिकाणी यापुढे सेल्फी घेण्यास मनाई असेल. 

मुंबईतील वरळी सी फेसच्या धर्तीवर गोव्यातही पर्यटक खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावून बसले आहेत. पंधरवड्यापूर्वी असेच साहस तामिळनाडूतील पर्यटकाच्या अंगलट आले आणि तो जीव गमावून बसला. पर्यटन खात्याने याची गंभीर दखल घेऊन गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षकाचे काम करणा-या दृष्टि लाइफ सेव्हिंग कंपनीला किना-यांवरील अशी धोकादायक ठिकाणे अधिसूचित करण्याचे आदेश दिले त्यानुसार 24 असुरक्षित ठिकाणे ‘नो-सेल्फी झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली असून तेथे साइनबोर्ड लावण्याचे ठरविले आहे. 

हीच ती 24 असुरक्षित ठिकाणे

उत्तर गोव्यातील बागा, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला खडकाळ भाग, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वें, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरदोण किना-यांवरील खडकाळ भाग तसेच दक्षिण गोव्यातील आंगोद, बोगमाळो, होळांत, बायणा, जपानिझ गार्डन, बेतुल, खणगीणी, पाळोळें, खोला, काब द राम किल्ला, पोळे, गालजीबाग, तळपणा व राजबाग या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’चे फलक लागणार आहेत.  

दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले, ‘काही ठिकाणांवर असलेले साइनबोर्ड अपग्रेड करण्यात आले आहेत. झेंड्यांवर सचित्र निर्देश (पिक्टोरियल इनस्ट्रक्शन), आपत्कालीन टोल फ्री क्रमांक व काय करावे आणि काय करू नये याबद्दलच्या सूचना देण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना व प्रवाशांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण या दिवसात समुद्र खवळलेला असतो आणि प्रचंड वेगाने वारे वाहत असते. पोहण्यासाठी व पाण्यातल्या साहसी उपक्रमांसाठी हे खराब हवामान उपयुक्त नसते. सर्व ‘नॉन-स्विम’ ठिकाणांवर इशारे देणारे लाल झेंडे लावण्यात आले आहेत.

               जीवरक्षकांची सेवा 

राज्यात दृष्टी कंपनीचे सुमारे ६00 जीवरक्षक किनाºयांवर बुडणाºयांना वाचविण्याचे काम करतात. मान्सूनमध्ये वातावरणावर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दररोज सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात असतात. याव्यतिरिक्त आपत्कालीन सेवेसाठी दोन जीवरक्षक रात्री ८ वाजेपर्यंत जीवरक्षक टॉवरवर तैनात करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत किनाºयांवर सुरक्षा गस्तीही होतात. दृष्टी मरीनकडे 

गोव्याच्या किनाºयांवर २00८ सालापासून जीवरक्षक तैनात असून असा दावा केला जातो की, आजपावेतो३ हजारहून अधिक जणांचे प्राण वाचविण्यात आले. ज्यामुळे गोव्यातील समुद्रावरील मृत्युंच्या संख्येत ९९ टक्क्यांनी घट झाली आहे.  

             सुरक्षेला प्राधान्य : काब्राल 

गोवा पर्यटन विकास महांमडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘पर्यटकांच्या सुरक्षेला सरकारचे नेहमीच प्राधान्य राहिलेले आहे परंतु पाहुण्यांनीही इशारे, सूचना यांचे पालन करायला हवे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे खडकांमध्ये सेल्फी काढणे किंवा पोहायला समुद्रात जाणे धोकादायक आहे.’

Web Title: Visitors, beware of 'these' 24 unsafe places in Goa! Forbidden to take selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा