विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 03:28 PM2024-05-07T15:28:23+5:302024-05-07T15:28:52+5:30
यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
नारायण गावस, पणजी: यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दिवसभर ग्रामीण भागापासून शहरीभागापर्यंत सर्वभागातू्न दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आले होेते. यासाठी राज्यभरात त्यांच्यासाठी खास ३० रिक्षा विविध मतदार संघात नेमल्या होत्या. दिव्यांगाच्या घरी जाऊन त्यांना व्हिलचेअरवरुन या रिक्षामध्ये बसून मतदान केंद्रावर आणले जात होते.
यंदा मुख्य निवडणूक कार्यालय सुरुवातीपासून दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती सुरु केली होती. राज्यभरातील कुठलाच दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य दिव्यांग आयाेग तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे दिव्यांगाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यांना मतदान केंद्रावर येण्यासाठी कुठल्याच अडचणी भासू नये यासाठी प्रथमच या रिक्षा ठेवण्यात आल्या होत्या. या रिक्षातून त्यांना बसवून मतदान केंद्रावर आणले हाेते. त्यामुळे दिव्यांगानी आंनद व्यक्त केला. यात ज्येष्ठ आजारी मतदारांनाही आणण्यात आले.
पूर्वी लाेकसभेच्या निवडणूकांमध्ये असे दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर आणताना दिसत नव्हते. फक्त पंचायत तसेच जिल्हापंचयात व विधानसभेत निवडणूकांमध्ये दिव्यांग मतदारांना लाक आपली गाडी घेऊन मतदानासाठी आणत होते. यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण यंदा खास या रिक्षा असल्याने व मतदान केंद्रावर विविध सुविधा असल्याने दिव्यांगाचे मतदान वाढणार आहे.