१0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

By admin | Published: September 20, 2015 01:58 AM2015-09-20T01:58:49+5:302015-09-20T01:59:00+5:30

पणजी : जीव्हीके इएमआरआयने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वी देण्यात येणारे थकलेले वेतन व पगारवाढ अजूनही दिली नाही. याबाबत

The wages of 108 ambulance staff were tired | १0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

१0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

Next

पणजी : जीव्हीके इएमआरआयने १0८ रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वी देण्यात येणारे थकलेले वेतन व पगारवाढ अजूनही दिली नाही. याबाबत कामगारांनी अनेक वेळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला तसेच समितीशीही बोलणी केली. मात्र, कोणताही परिणाम झाला नाही.
जीव्हीके इएमआरआय व्यवस्थापन गोवा राज्याबरोबरच इतर आठ राज्यांत सेवा पुरवितात. इतर सर्व राज्यांतील कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्वीच थकबाकी वेतन दिले जाते. मात्र, यंदा गोव्यातील कर्मचाऱ्यांना ही थकबाकी देण्यात आली नाही. कंपनीने १0८ सेवा सुरू केल्यापासून गतवर्षीपर्यंत चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना चतुर्थीपूर्व थकबाकी दिली होती. यंदाही तशीच दिली जाणार या आशेने कर्मचारी होते. व्यवस्थापनाअंतर्गत एकूण १९४ कामगार काम करतात. मात्र, चतुर्थीची तारीख उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना निराशेलाच सामोरे जावे लागले. तसेच दरवर्षी सप्टेंबरपूर्वी पगारवाढ करण्यात येते. यंदा पगारवाढीची प्रक्रियाही केली नसल्याने सूत्रांनी सांगितले.
याबाबत कर्मचाऱ्यांनी समितीशी संपर्क साधला होता. समितीच्या सदस्यांनी व्यवस्थापनाशी बोलणी करून चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळावी, अशी मागणी करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, समितीकडून थकबाकीचे वेतन मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न झाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अजूनही १0८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन योग्य सोयीसुविधा पुरवत नसल्याची तक्रार नेहमीच कर्मचारी करत असतात. तसेच अपुऱ्या सोयी उपलब्ध करून या रुग्णवाहिका चालविल्या जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनीच जनतेच्या नजरेसमोर आणून दिले होते.
वेळोवेळी आधुनिक आणि आवश्यक यंत्रांनी रुग्णवाहिका अद्ययावत राहाव्यात म्हणून कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही छेडले होते. मात्र, त्याचा परिणाम काहीही झाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्मचाऱ्यांनी जीव्हीके इएमआरआय व्यवस्थापनाच्या विरोधात आवाज उठविल्यापासून कर्मचाऱ्यांची विविध तऱ्हेने सतावणूक करण्यात येते, असेही सूत्रांनी सांगितले. व्यवस्थापनाचा आणि सरकारचा लागेबंध असल्याने व्यवस्थापन चांगली सेवा देण्याबाबत लक्ष देत नाही. सरकारने व्यवस्थापनाच्या कारभारावर लक्ष द्यावे तसेच १0८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मार्गी लावावे, अशी मागणीही काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The wages of 108 ambulance staff were tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.