गोव्यात वाघिणीचा वृध्दापकाळाने मृत्यू
By Admin | Published: June 28, 2017 09:16 PM2017-06-28T21:16:27+5:302017-06-28T21:16:27+5:30
बोंडला येथील अभयारण्यातील ‘संध्या ’नावाने ओळखली जाणा:या वाघिणीचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
फोंडा, दि. 28 - बोंडला येथील अभयारण्यातील ‘संध्या ’नावाने ओळखली जाणा:या वाघिणीचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. तिला 2009 साली गोव्यातील बोंडला अभयारण्यात आणले होते. वन खात्याचे अधिका-यांच्या उपस्थितीत अभयारण्यात अंत्यसंस्कार केले.
अभयारण्य अधिका:याकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याचा जन्म 1 फेब्रुवारी 2003 मध्ये विशाखापट्टणम् येथे झाला. संध्या ही 14 वर्षे 4 महिने आयुष्य जगली. 2009 साली सात वर्षाची असताना तिला इंदिरा गांधी जिओलॉजिकल पार्क विशाखापट्टणम् येथून बोंडला-गोवा येथील अभयारण्यात आणले होते. काही दिवसांपासून तिने मांसाहार घेणे बंद केले होते. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते.