उपविभागीय जिल्ह्यांना अधिसूचनेची प्रतीक्षा
By admin | Published: May 13, 2015 01:08 AM2015-05-13T01:08:24+5:302015-05-13T01:08:34+5:30
उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत
उत्तर व दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपविभागीय जिल्ह्यांंची सरकारने स्थापना करण्याच्या हेतूने अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमले आहेत. उपजिल्हाधिकारी सरकारने नेमला असला तरी उपविभागीय जिल्ह्यांची अधिसूचना सरकारने जारी केली नसल्याने या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात कामाविना बसण्याची वेळ आली आहे.
दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात कामे करून घेण्यासाठी पणजी व मडगावात येणे त्रासदायक होत असल्यामुळे सरकारने जानेवारी महिन्यात उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी उपजिल्ह्यात विभागणी केली.
उत्तर गोव्यात बार्देस आणि दक्षिण गोव्यात फोंडा असे दोन विभाग तयार करण्यात आले. तयार करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हााधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे उपविभागीय कार्यालयाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला.
हे अधिकारी आठवड्यातून दोनवेळा आपल्या कार्यालयात भेट देतात. त्यांची नेमणूक करून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी उपविभागीय कार्यालय अधिसूचित केले नसल्याने त्यांना आपल्या कार्यालयात भेट देण्यापलीकडे काहीच काम देण्यात आलेले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना काहीच काम नसल्याने आपल्या कार्यालयात बसून राहावे लागत आहे.
तसेच त्यांच्यासाठी अजूनपर्यंत योग्य असा कर्मचारी वर्ग सरकारने उपलब्ध केला नसल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येणारे अधिकारी व उपविभागीय जिल्हा सरकारने अधिसूचित करण्याची गरज आहे, तरच त्याचा फायदा दोन्ही जिल्ह्यांंतील लोकांना मिळू शकतो.