दुसऱ्या दिवशीही धो धो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:17 AM2017-07-20T02:17:01+5:302017-07-20T02:22:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यात सलग तीन दिवस पावसाने धडाका लावल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. मंगळवारी व बुधवारी मिळून सरासरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्यात सलग तीन दिवस पावसाने धडाका लावल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. मंगळवारी व बुधवारी मिळून सरासरी ८ इंच पावसाची नोंद झाली.
सलग तीन दिवस जोराचा पाऊस कोसळला. त्यातही मंगळवारी आणि बुधवारी पावसाने झोडपून काढले. राज्यातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. बुधवारी पाऊस उसंत घेत पडल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. पणजीतील अर्धे रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळूनही पडली. पणजीत दयानंद बांदोडकर मार्गावर झाडाची फांदी पडल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. पणजीत १२ तासांत अडीच इंचाहून अधिक पाऊस पडला, तर २४ तासांत ३ इंच पाऊस पडला. राज्यात सरासरी चार इंच पाऊस पडला.
पुढील दोन दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.