कचरा प्रकल्पामुळे तिसवाडीचा प्रश्न सुटेल : लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:41 PM2020-09-30T12:41:22+5:302020-09-30T12:41:49+5:30
गोव्यात पूर्वी कधीच कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र खाते नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे खाते निर्माण केले व ते मंत्री लोबो यांच्याकडे सोपवले.
पणजी : पणजीपासून अवघ्या किलोमीटर अंतरावर बायंगिणी येथे जो कचरा प्रक्रिया प्रकल्प साकारणार आहे, त्या प्रकल्पामुळे पणजीसह तिसवाडी तालुक्यातील कच:याची समस्या सुटेल असा विश्वास विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केला. लोबो यांच्याकडे कचरा व्यवस्थापन हे खातेही आहे.
गोव्यात पूर्वी कधीच कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र खाते नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे खाते निर्माण केले व ते मंत्री लोबो यांच्याकडे सोपवले. लोबो लोकमतला मुलाखत देताना म्हणाले, की बायंगिणी येथील नियोजित प्रकल्पात दिवसाला अडिचशे टन कच:यावर प्रक्रिया केली जाईल. अशा प्रकारच्या प्रकल्पांची गोव्याला गरज आहे. गोवा हे पर्यटन राज्य आहे. त्यामुळे येथे कच:याची निर्मिती खूप होते. पणजीसह जुनेगोवे व अन्य सर्व भागांमध्ये पर्यटक जात असतात. शिवाय प्रत्येकाच्या घरात कच:याची निर्मिती होते. हा कचरा नेऊन कुठे फेकायचा हा प्रश्न असतो. अशावेळी प्रक्रिया प्रकल्प उभारणो हाच पर्याय ठरतो.
लोबो म्हणाले, की बार्देश तालुक्यासाठी आम्ही साळगावच्या पठारावर प्रकल्प उभा केला. त्या प्रकल्पाला प्रारंभी काहीजण विरोध करत होते. मात्र विरोध टीकला नाही, कारण प्रकल्प यशस्वी झाला. आधुनिक तंत्रज्ञान त्या प्रकल्पासाठी वापरले गेले. खुद्द राष्ट्रीय हरित लवादाच्या चेअरमननांनी त्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. बायंगिणी येथेही अशाच प्रकारचा प्रकल्प साकारणार आहे. त्यासाठी पर्यावरण विषयक दाखला मिळाल्यानंतरच सरकारने निविदा जारी केली आहे. एकदा कामाचा आदेश कंत्रटदाराला दिल्यानंतर मग अठरा महिन्यांत प्रकल्प उभा होईल. सध्या पणजीसह तिसवाडीतील अन्य काही भागांतील कचरा साळगावच्या प्रकल्पात आणला जातो. हे अपेक्षित नाही. गोव्यात पुढील काळात आणखी काही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे राहतील. कच:यापासून खताची निर्मिती करता येते. औद्योगिक कचरा, वैद्यकीय कचरा या सगळ्य़ासाठी विविध प्रकल्प पुढील काळात साकारतील. वेर्णा येथेही आम्हाला प्रकल्प उभा करायचा आहे.