पाणी टंचाईचे संकट! तिलारीतून उद्यापासून गोव्याला पाणी पुरवठा ६६ दिवस बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 06:23 PM2023-10-09T18:23:47+5:302023-10-09T18:25:06+5:30

या काळात या धरणातून पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून रहावे लागणार आहे.

Water shortage crisis! Water supply from Tilari to Goa will be closed for 66 days from tomorrow! | पाणी टंचाईचे संकट! तिलारीतून उद्यापासून गोव्याला पाणी पुरवठा ६६ दिवस बंद!

पाणी टंचाईचे संकट! तिलारीतून उद्यापासून गोव्याला पाणी पुरवठा ६६ दिवस बंद!

googlenewsNext

पणजी: उत्तर गोव्यात बहुतेक ठिकाणी आणि बहुतेक करून पेडणे आणि बार्देश तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या तिलारी धरणाच्या दुरुस्ती कामासाठी ६६ दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे गोव्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे.

धरणाच्या दुरुस्ती कामासाठी १० ऑक्टोबर ते १५ डिसेंबर असे दोन महिन्याहून अधिक दिवस या धरणाच्या दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने गोव्याला कळविले आहे. या काळात या धरणातून पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून रहावे लागणार आहे.

या विषयी माहिती देताना मंत्री शिरोडकर यांनी म्हटले आहे की दुरुस्तीकामांसाठी धरण पाणी पुरवठ्यासाठी बंद ठेवावे लागणार असल्यामुळे गोव्यात काही प्रमाणात पाणी समस्या होण्याची शक्यता आहे. परंतु लोकानी घाबरून जाण्याचे कारण नाही. गोवा सरकारकडून विशेष खबरदारी घेऊन पाणी व्यवस्थापन केले जाईल असे शिरोडकर यांनी सांगितले.

Web Title: Water shortage crisis! Water supply from Tilari to Goa will be closed for 66 days from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण