नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 11:38 AM2024-05-15T11:38:00+5:302024-05-15T11:39:08+5:30

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

water shortage in many places of goa | नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईमुळे लोक हैराण झाले आहेत. टैंकरही उपलब्ध नसल्याने दिवस तरी कसे काढावेत?, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. बेतोडा पंचायत क्षेत्रातील संतप्त रहिवाशांनी सोमवारी बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे साकोर्डा व परिसरात नळाद्वारे पाणी बंद झाल्याने विहिरींवर महिलांची गर्दी उसळत आहे. काऱ्यामळ, बाराभूमी, धारगे गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टैंकरही मिळत नसल्याने लोकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मार्ना, शिवोली येथे पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. लोकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. 

दरम्यान, म्हापणे यांनी इतर कोणत्याही भागांमध्ये पाणी टंचाई नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एरवी पर्वरी व परिसरात पाण्याची समस्या उ‌द्भवत असे; परंतु पर्वरीतील १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पर्वरीतील पाण्याची समस्या मिटली आहे. पर्वरीत आता टँकरची गरज राहिलेली नाही. तेथे टैंकर विनावापर राहतात.

बेतोड़ा पंचक्रोशीत कासारवाडा, दत्तगड आदी भागांत नळातून पाणीपुरवठा बंद झाला आहे. बार्देशमध्ये शिवोली मतदारसंघात आसगाव, हणजूण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. काणकोण तालुक्यालाही पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. माडीतळप, पोळे, दापट भागात लोकांना पाणी मिळत नाही.

साकोर्डा परिसरात पाच टँकरद्वारे पुरवठा

बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रगाडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तिथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईची कल्पना खात्याला आहे. मी तेथील सहायक अभियंत्याकडून आढावा घेतला असून, पाणीपुरवठ्यासाठी पाच टँकरची व्यवस्था केली जाईल. म्हापणे म्हणाले की, 'अनेकदा भूमिगत वीजवाहिन्या किंवा मलनिस्सारण वाहिन्या फोडल्या पोहोचत टाकताना जलवाहिन्या जातात. त्यामुळे नळांना पाणी नाही. जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार नित्याचेच बनले असून, ती मोठी डोकेदुखी ठरली आहे.

नळाच्या पाण्यात आढळले किडे

सांतआंदे मतदारसंघातील आजोशी मंडूर येथील घरांमध्ये नळांतून आलेल्या पाण्यात किडे आढळल्यानंतर तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आ आहे. सध्या या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काल आमदार वीरेश बोरकर यांनी बांधकाम, आरोग्य खाते, पंचायत सदस्य व ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी आरोग्य खात्याचा याविषयी अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


 

Web Title: water shortage in many places of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.