‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

By admin | Published: May 12, 2015 01:54 AM2015-05-12T01:54:14+5:302015-05-12T01:54:30+5:30

महाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत

Waterlogging in 35 villages due to 'Wirdi' | ‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

‘विर्डी’मुळे ३५ गावांत जलदुर्भिक्ष!

Next

सद्गुरू पाटील ल्ल पणजी
महाराष्ट्र सरकारची विर्डी नदीवर धरण बांधण्याची योजना ही उत्तर गोव्यातील वेगवेगळ्या ३५ गावांतील १ लाख ९ हजार लोकसंख्येला अत्यंत घातक ठरणार आहे, असे गोवा सरकारने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हा मुद्दा
सरकारने म्हादई पाणी तंटा लवादासमोरही मांडला आहे.
कर्नाटक आणि गोव्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीचाच एक प्रवाह महाराष्ट्रातील विर्डी गावातील कट्टीका नाला येथून जातो. येथूनच प्रवाह उत्तर गोव्यातील वाळवंटी नदीपर्यंत येतो. वाळवंटी नदीवर अत्यंत महत्त्वाची अशी पाणीपुरवठा योजना चालते व या योजनेद्वारे उत्तर गोव्यातील ३५ गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. महाराष्ट्र सरकारची ८ धरणे बांधण्याची योजना प्रत्यक्षात आली तर वाळवंटीवरील पाणीपुरवठा योजना बंद पडेल व त्यासाठी महाराष्ट्राची योजना गोव्यातील ३५ गावांसाठी अत्यंत घातक ठरेल, असे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांचेही म्हणणे आहे.
कट्टीका नाल्यातून गोव्याला येणारे सगळे पाणी बंद करण्याची योजना महाराष्ट्राने आखली आहे. (पान २ वर)

Web Title: Waterlogging in 35 villages due to 'Wirdi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.