म्हापशातील बाजारपेठेतील पारंपारिकता नष्ट होण्याच्या मार्गावर : व्यापारी संघटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:35 PM2019-01-17T16:35:21+5:302019-01-17T16:35:39+5:30

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे.

On the way to destroying the tradership of the market in Mercury: Traders Association | म्हापशातील बाजारपेठेतील पारंपारिकता नष्ट होण्याच्या मार्गावर : व्यापारी संघटना 

म्हापशातील बाजारपेठेतील पारंपारिकता नष्ट होण्याच्या मार्गावर : व्यापारी संघटना 

Next

म्हापसा : जगप्रसिद्ध अशा म्हापसा शहरातील पारंपारिक बाजारातील पारंपारिकता बाजाराची ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारच्या बाजारावरील पालिकेने आपले नियंत्रण गमावले असून त्यात भर म्हणून बनावटगिरी, फसवेगिरी, गैरप्रकार, वेश्या व्यवसाय यांना ऊत आलेला असल्याचा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेच्या बिनविरोध निवड झालेल्या नुतन समितीने केला आहे. 

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे. त्यात भर म्हणून सरकारकडून खासगी सरकारी सहकार्याने नवीन बसस्थानक उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यात शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला असून हे मॉल सुरु झाल्यास व्यापा-यांवर होत असलेल्या परिणामात भर पडणार असल्याचे समितीचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

बाजारपेठेतील विक्रेत्यांना देण्यात येत असलेल्या परवान्यांवर पालिकेने नियंत्रण गमावले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पारंपारिकते बरोबर मसाल्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारात रस्त्यावर बसणा-या विक्रेत्यांना व्यापारी परवाने पालिकेकडून देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून बनावटगिरी केली जात असून दुकानात मिळणारी वस्तू रस्त्यावर उपलब्ध होवू लागल्याने ग्राहकांनी दुकानदारांकडे दुर्लक्ष केले आहे. शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बाजारातून फिरणे कठीण झाले आहे. गुरांसोबत बाजारातून जाणारी वाहने व जागा मिळेल तिथे बसणा-या विक्रेत्यांमुळे परिणाम झाले आहेत. दुकानातील वस्तू रस्त्यावर मिळू लागल्याने तसेच त्यांच्यामुळे दुकाने ग्राहकांच्या नजरेला पडत नसल्याने परिणामात भर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी दिली. 

बाजारातील परिस्थितीला पालिका जबाबदार असल्याचे आरोप समितीचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी केले. निरीक्षकांनी बाजारावरचे नियंत्रण गमावले आहे. त्यातून सुविधांचा अभाव झाला पालिकेचे मुख्याधिकारी बाजारात कधीच येत नसल्याची किंवा पाहणी सुद्धा करीत नसल्याची माहिती यावेळी दिली. व्यापा-यांकडून पालिकेला फक्त कराच्या रुपात महसूल प्राप्त होतो; पण रस्त्यावरील विक्रेत्यांकडून गैरमार्गाने प्राप्ती होत असल्याचे आरोपही तिवरेकर यांनी केले. 

काही विक्रेत्यांना बाजारातून हटवण्यात आले होते. हटवण्यात आलेल्यांचे पुर्नवसन करण्यात आले असले तरी त्यांच्या जागी नव्या विक्रेत्यांना बसवण्यात आले. भाजी तसेच मासळी मार्केटावरही दुर्लक्ष झाले असल्याने त्याचे परिणाम बाजारावर होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  

गैरप्रकार नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिका-याचे बाजारावर नियंत्रण हवे असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तसेच पोलिसांकडून सुद्धा त्यात लक्ष घालून गैरप्रकार थांबवणे गरजेचे असल्याची माहिती दिली. बाजारातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापारी संघटनेकडून सहकार्य करण्याची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली. 

Web Title: On the way to destroying the tradership of the market in Mercury: Traders Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा