निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

By आप्पा बुवा | Published: July 12, 2023 06:28 PM2023-07-12T18:28:07+5:302023-07-12T18:29:13+5:30

'सदर गोष्टींचा विकास झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे'.

We will create employment for two thousand youths through nature tourism: MLA Ganesh Gawkar | निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

googlenewsNext

फोंडा- सावर्डे मतदार संघातील निसर्ग पर्यटनाला चालना  देण्यासाठी विविध  आराखडे बांधलेले असून सदर कार्यक्रमाद्वारे अंतर्गत पर्यटना चा विकास होईल व मतदार संघातील किमान दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. असा विश्वास स्थानिक आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी व्यक्त केला.

या संदर्भात ते पुढे म्हणतात की सावर्डे मतदार संघाला निसर्गाने भरभरून दिले आहे . इथल्या डोंगर कपारी मधून साहसी पर्यटनाला वाव आहे. तर फेसाळ वाहणाऱ्या आणखीन धबधब्यामुळे इको पर्यटनला संधी निर्माण झाल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विकास आणि प्रचार करण्यावर महामंडळ भर देणार आहे. सध्या इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटन येत असतात त्या पर्यटकांना आणखीन चांगल्या सुविधा आम्ही येथे निर्माण करणार आहोत. सदर गोष्टींचा विकास झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

 सावर्डे मतदार संघातील काले गावात जी टी डीसी तर्फे साहसी पर्यटन मोहीम आखण्याची योजना आहे. जेथे रॉक क्लाइंबिंग आणि अन्य साहसी उपक्रम असतील. तांबडी सुर्ला येथील मंदिराला भेट देणारे पर्यटक दूधसागर काले आणि जवळच्या पर्यटन स्थळाना  भेट देतील त्यामुळे कॅब, रिक्षा चालक, हॉटेल्स आणि अनेकांना व्यवसाय मिळेल. पुढील दोन वर्षात सावर्डे मतदार संघातील सुमारे दोन हजार युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यावर माझा भर असेल. जेथे गरज आहे तेथे मनुष्यबळ करण्यासाठी आम्ही डेटा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: We will create employment for two thousand youths through nature tourism: MLA Ganesh Gawkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.