शेतकऱ्यांना लागेल ते सहकार्य करू: सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:32 AM2023-04-18T08:32:52+5:302023-04-18T08:34:17+5:30

बोरी देऊळवाडा येथील शेतकऱ्यांनी घेतले काळ्या तांदळाचे पिक

we will help the farmers as much as they need said subhash shirodkar | शेतकऱ्यांना लागेल ते सहकार्य करू: सुभाष शिरोडकर

शेतकऱ्यांना लागेल ते सहकार्य करू: सुभाष शिरोडकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : देऊळवाडा बोरी येथे मागील पंधरा ते वीस वर्षांपासून शेतजमीन विविध कारणांमुळे पडीक ठेवण्यात •आली होती. बोरी येथील शेतकरी आज पुन्हा शेती करण्यासाठी पुढे आले आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. राज्यात अनेक शेतकरी कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेऊन पुढे आले आहेत. बोरी गावातील शेती पुन्हा फुलावी यासाठी येथील शेतकऱ्यांपुढे असलेल्या सर्व अडचणी सोडवून त्यांना आवश्यक असलेली सर्व साधनसुविधा उपलब्ध करून शेती करण्यासाठी सहकार्य करणार आहे, असे आश्वासन जलस्रोतमंत्री मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

बोरी देऊळवाडा येथील स्थानिक, आमदार, पंच सदस्य यांच्या अथक परिश्रमानंतर १५ वर्षांनी पडीक शेती पुन्हा फुलवण्यात यश लाभले. बोरी येथे मागील अनेक वर्षांनी येथील शेतकऱ्यांनी काळ्या भाताचे पीक व ज्योती या भाताची लागवड यशस्वी करुन दाखवली. पंच जयेश नाईक, अभय केसरकर, दत्ता गावडे, अशोक नाईक, कालिदास नाईक, रमेश नाईक, आनंद पारपती प्रकाश नाईक, आनंद गावडे यांनी दिलेल्या योगदानाची स्तुती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केली.

पर्यावरणप्रेमी अभय केसरकर, दत्ता गावडे यांनी स्वत: शेतकऱ्याबरोबर शेती नांगरून प्रोत्साहन दिले. यावेळी जयेश नाईक, प्रकाश नाईक, आनंद पारपती, अभय केसरकर, आनंद गावडे यांनी आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या काळ्या तांदूळ लागवड केली. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी एक पीक भाजीपाला व एकवेळ भातशेती लागवड करण्याचे सुचवले. या कामासाठी यापढे सर्वोत्तम मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्थानिक जयेश नाईक यांच्या कामाची पद्धत व सातत्याचेही अभिनंदन केले.

अभय केसरकर यांनी मदतीचा हात देणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सध्या काळ्या तांदळाची मोठी मागणी आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब या रुग्णांसाठी हा तांदूळ वापरण्यात येतो, असे जयेश नाईक यांनी सांगितले.

अनेक वर्षे शेती बंद

देऊळवाडा कोपले येथील शेती गेली १५ वर्षापासून बंद करण्यात आली होती. यासाठी विविध कारणे होती. बांध फुटून शेतीची नासाडी, पिकाची जनावरांकडून नासाडी अशी अनेक कारणे होती. देऊळवाडा कोपले भागातील सर्व शेतकऱ्यांच्या विनंतीवरून मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्वतः पदरमोड करून संपूर्ण शेतजमीन योग्य पद्धतीने करून दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: we will help the farmers as much as they need said subhash shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा