कोविड काळात नेतृत्व बदलाच्या राजकीय अफवांना ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:43 PM2020-07-17T21:43:46+5:302020-07-17T21:45:44+5:30
राणे यांनी फर्मागुडी येथील कोविड काळजी केंद्राला तसेच धारबांदोडा आरोग्य केंद्रासह अन्य काही जागांना भेट दिली.
पणजी : कोविड संकट काळात राज्यात शुक्रवारी राजकीय अफवांनाही ऊत आला. लॉकडाऊनमध्ये लोक घरी असतानाच सरकारमध्ये नेतृत्व बदल होईल अशा प्रकारची अफवाही शुक्रवारी रंगली. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे फोंडा तालुक्याच्या भेटीवेळी फर्मागुडीला मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना भेटले अशा प्रकारची चर्चा रंगल्याने भाजपमधीलही काहीजणांना आश्चर्य वाटले. मात्र नेतृत्व बदलाचा विषयच येत नाही, सगळ्य़ा वायफळ चर्चा व अफवा आहेत, असे मंत्री राणे यांनी लोकमतला सांगितले.
राणे यांनी फर्मागुडी येथील कोविड काळजी केंद्राला तसेच धारबांदोडा आरोग्य केंद्रासह अन्य काही जागांना भेट दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी काही मंत्र्यांवर विविध तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. फोंडा, सत्तरी व पेडणे या तीन तालुक्यांची जबाबदारी राणो यांच्यावर आहे. राणो यांनी फर्मागुडीला भेट दिल्यानंतर तिथे आमदार ढवळीकर यांनीही त्यांची भेट घेतली अशी राजकीय चर्चा सुरू झाली. ही चर्चा मुख्यमंत्री सावंत यांच्यार्पयतही लगेच पोहचली. सरकारमध्ये नेतृत्व बदल घडवून आणण्यासाठी राणो प्रयत्नशील असल्याची अफवा पिकवली गेली. प्रत्यक्षात मगोपकडे केवळ एकच आमदार असल्याने ढवळीकर यांच्याकडे हातमिळवणी करण्यात कोणताच राजकीय अर्थ नाही याची पूर्ण जाणीव विश्वजित यांनाही आहे हे भाजपला पटते. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर व अन्य काही मंत्र्यांशी सावंत यांचे एकदम चांगले नाते असल्याने नेतृत्व बदल सध्या शक्यही नाही याची सावंत यांच्या राजकीय विरोधकांनाही कल्पना आहे.
दरम्यान, राणे यांनी लोकमतला सायंकाळी सांगितले की, आपण पूर्णपणे कोविड व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त आहे. कुणी तरी मंत्रिमंडळात गैरसमज निर्माण करण्यासाठी नेतृत्व बदलाच्या अफवा पिकविल्या. आम्ही मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वासोबतच आहोत. अफवा मुख्यमंत्र्यांर्पयत पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मला त्यांना आलेला एसएमएस पाठवला. मुख्यमंत्र्यांना माङयाविषयी कोणतीच शंका नाही.