स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये लगबग

By admin | Published: September 15, 2014 01:25 AM2014-09-15T01:25:57+5:302014-09-15T01:40:00+5:30

पर्यटक मोसम तोंडावर : जलक्रीडावाल्यांचीही लगीनघाई

Welcome to Hotels, Night Clubs | स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये लगबग

स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये लगबग

Next

पणजी : गोव्याचा पर्यटक मोसम येत्या महिन्यापासून सुरू होत असून देशी-विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. विदेशी पाहुण्यांसाठी जेवणा-खाणाचे नवे मेनू कोणते असावेत इथपासून करमणुकीच्या बाबतीत नावीन्य कसे आणता येईल इथपर्यंत नियोजन चालले आहे. जलक्रीडावाल्यांची परवान्यांच्या नूतनीकरणासाठी धावपळ चालली आहे.
पावसाने उसंत घेतल्याने हॉटेलांची रंगरंगोटी चालू आहे. जलक्रीडा तसेच जलसफरी आयोजित करणाऱ्या एकाने सांगितले की, प्रत्येक गिऱ्हाईकाकडून साधारणपणे ४०० रुपये मिळतात. दिवशी साधारणपणे आम्हाला २० ते ३० पर्यटक गिऱ्हाईके मिळतात. हॉटलांमध्ये परिषदा असल्यास एखाद दिवशी शंभरपेक्षा अधिक पर्यटक मिळतात. गोव्यात वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळून ४00 हून अधिक बोटी आहेत ज्या जलसफरी घडवून आणतात याशिवाय पॅराग्लायडिंग किनाऱ्यांवर होते.
एलपीके नाईट क्लबचे नंदन कुडचडकर म्हणाले की, या वेळी मेनूमध्ये तसेच करमणूक कार्यक्रमांमध्ये पर्यटकांच्या अभिरुचीनुसार नावीन्य आणण्याचा तसेच जागतिक उपाययोजना करण्याचा निर्धार केला आहे. पाहुण्यांना अधिकाधिक आलिशान व आरामदायी सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत.
पर्यटक मोसम सुरू झाल्यानंतर बरेच नाईट क्लब करमणूक कार्यक्रम बदलत असतात. आमच्याकडे विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात खास जेवणासाठी येत असतात. त्यांच्यासाठी म्युझिकची व्यवस्था आम्ही करतो. देशी पाहुण्यांना इडीएम म्युझिक हवे असते. आमच्याकडे एकाहून एक सरस असे संगीत कलाकार आहेत, असे पणजीतील डाउन द रोड नाईट क्लबचे मालक लिंडन फुर्तादो यांनी सांगितले.
सिंक नाईट क्लबच्या विपणन विभागाच्या स्नेहा रॉड्रिग्स म्हणाल्या की, या वर्षी मोठ्या संख्येने इराणमधून पर्यटक येणार असे ऐकले आहे. त्यांच्यासाठी कोणता मेनू असावा किंवा स्थानिक खाद्यपदार्थ त्यांच्याकरीता अधिकाधिक प्रिय कसे बनविता येतील, हे पाहिले जाईल.
(प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Hotels, Night Clubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.