‘वेलकम टू गोवा’... ओवाळून -फुलांचा हार घालून थाटात पर्यटकांचे केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 04:24 PM2022-11-16T16:24:09+5:302022-11-16T16:25:13+5:30
मुरगाव बंदरात ६५० विदेशी पर्यटक आणि जहाजावरील ४६१ अधिकारी - कर्मचाºयांना घेऊन पर्यटक हंगामातील पहीले विदेशी जहाज झाले दाखल
वास्को: बुधवारी (दि.१६) सकाळी गोव्याच्या यंदाच्या पर्यटक हंगामातील ‘वायकींग मार्स’ नामक पहीले विदेशी क्रुज जहाज ६५० विदेशी पर्यटक आणि त्या जहाजावर काम करणाºया ४६१ अधिकारी - कर्मचारी मिळून ११११ जणांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले. कोविड महामारीनंतर सुमारे अडीच वर्षाने मुरगाव बंदरात पहीले विदेशी क्रुज जहाज पर्यटकांना घेऊन दाखल झाल्यानंतर येथे त्यांचे ढोल - ताशंच्या तालावर, तसेच विदेशी पर्यटकांना ओवाळून आणि फुलांचा हार घालून त्यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.
मुरगावात दाखल झालेल्या ह्या हंगामातील पहील्या विदेशी क्रुज जहाजावरील पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्व:ता उपस्थिती लावून त्यांनी त्यांचे स्वागत केले. यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यात विदेशी आणि राष्ट्रीय मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहीती आमोणकर यांनी पत्रकारांना दिली.
यंदाच्या पर्यटक हंगामातील मुरगाव बंदरात दाखल झालेले हे पहीले विदेशी चार्टर नोरव्हे राष्ट्रातून निघाल्यानंतर ते दुबईला होऊन नंतर भारताच्या मुंबई बंदरात तीन दिवसापूर्वी दाखल झाले. बुधवारी सकाळी ते क्रुज जहाज गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असून बुधवारी सकाळी येथून ते सर्व विदेशी पर्यटकांना घेऊन कोलंबो जाण्यासाठी रवाना होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. कोविड महामारीनंतर सुमारे अडीच वषार्नंतर विदेशी पर्यटकांना घेऊन पहीले क्रुज जहाज मुरगाव बंदरात दाखल होणार असल्याने गोव्यातील विविध पर्यटक व्यवसायांशी जुळलेल्या नागरिकांबरोबरच टॅक्सी, रिक्क्षा चालकही मोठे उत्साहीत असल्याचे दिसून आले.
बुधवारी सकाळी १० च्या सुमारास जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले. मात्र त्या जहाजावरून येणाºया विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी ‘मुरगावचा राजा टॅक्सी युनियन’ संघटनेने बंदरातील क्रुज टर्मिनल बर्थच्या बाहेर उपस्थिती लावल्याचे दिसून आले. मुरगाव बंदरात दाखल होणाºया त्या विदेशी क्रुज जहाजावरील पर्यटकांच्या स्वागतासाठी येथे खास ढोल - ताशांच्या पथकाची व्यवस्था केली होती. जहाज बंदरात दाखल झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर काही विदेशी पर्यटक येथे त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या खासगी बसमधून तर काही विदेशी पर्यटक टॅक्सीमधून गोवा दर्शनासाठी निघून गेले. जहाजावरून उतरून क्रुज टर्मिनल बर्थच्या बाहेर आल्यानंतर विदेशी पर्यटकांचे ढोल - ताशांच्या तालावर तसेच त्यांना ओवाळून आणि फुलांचा हार घालून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
‘वेलकम टू गोवा’ अशा शब्दात त्या विदेशी पर्यटकांना फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत होत असल्याचे पाहून ते पर्यटकही मोठे आनंदीत झाले. मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पहील्या विदेशी क्रुज जहाजावरून आलेले विदेशी पर्यटक विविध देशातील असून त्यापैंकी बहुतेक पर्यटक युरोप मधून असल्याची माहीती प्राप्त झाली. यंदाच्या पर्यटक हंगामात विदेशी आणि राष्ट्रीय मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असल्याची माहीती प्राप्त झाली.
स्वागतासाठी आमदारांनी लावली उपस्थिती
मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पहील्या विदेशी क्रुज जहाजावरील विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी सकाळी उपस्थिती लावली. ह्या पर्यटक हंगामातील पहीले विदेशी क्रुज जहाज गोव्यात दाखल झाल्याने आजचा दिवस आनंदाचा असल्याचे आमोणकर म्हणाले. पुढच्या दिवसात गोव्यात राष्ट्रीय आणि विदेशी मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असून यामुळे गोव्यातील विविध पर्यटन व्यवसायांना फायदा होणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. एका महीन्यापूर्वी ह्या हंगामातील पहीले राष्ट्रीय क्रुज जहाज पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले असून आज विदेशी क्रुज जहाजांची सुरवात झाल्याने विविध पर्यटक व्यवसायांबरोबरच येथील टॅक्सी व्यवसायिकांना याचा चांगला फायदा होणार.
कोरोना महामारीत संपूर्ण जगात सर्वकाही ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वांबरोबरच गोव्यातीलही विविध व्यवसायिकांना मोठी नुकसानी सोसावी लागली होती. आता सर्वकाही ठीक होत असून यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यातील पर्यटक व्यवसायाशी जुळलेल्या सर्व व्यवसायिकांना उत्तम फायदा होणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.
जहाज काही दिवस थांबल्यास ठरेल फायदेशीर: आमदार संकल्प आमोणकर
मुरगाव बंदरात दाखल होणारी देशी आणि विदेशी क्रुज जहाज सकाळी येऊन रात्री दुसºया ठीकाणी जाण्यासाठी निघून जाते. यामुळे येथील विदेशी - देशी पर्यटकांना थोडेच तास गोवा दर्शन करण्यासाठी मिळतात. मुरगाव बंदरात दाखल होणारी क्रुज जहाजे जर सुमारे दोन दिवस थांबल्यास पर्यटकांना गोव्याच्या दर्शनाचा उत्तम लाभ उठवण्यासाठी नक्कीच फायदा होणार. त्यातून गोव्याच्या विविध पर्यटन व्यवसायांना नक्कीच उत्तम फायदा होणार. गोव्यात येणारी क्रुज जहाजे काही दिवस मुरगाव बंदरात रहावी यासाठी लवकरच गोवा सरकार नक्कीच उचित पावले उचलणार असा विश्वास आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.