स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? मायलकल लोबो; अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 10:35 AM2024-03-16T10:35:10+5:302024-03-16T10:35:41+5:30

कारण आमदार म्हणून माझ्यासाठीही हा चिंतेचा विषय आहे.

what exactly did swami see in calangute asked mla michael lobo | स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? मायलकल लोबो; अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार

स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? मायलकल लोबो; अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तपोभूमी पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? हे मी त्यांच्या स्थानिक अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी काल पत्रकारांना सांगितले.

लोबो म्हणाले की, कळंगुटमध्ये थायलंडसारखी स्वैराचाराची स्थिती असल्याच्या स्वामींजींच्या विधानाचा व्हायरल व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे काही जर चुकीचे घडत असेल ते बंद व्हायला हवे. कारण आमदार म्हणून माझ्यासाठीही हा चिंतेचा विषय आहे.

कळंगुट तसेच अन्य किनाऱ्यांवर धडक कारवाई करून दलालांचा उपद्रव सरकारने बंद केला. हायकोर्टाच्या आदेशावरून डान्स बारही बंद झाले आहेत. कळंगुटला देशी तसेच विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. कळंगुटच्या कोणत्या लेनमध्ये स्वामींजींनी काय पाहिले, हा माझ्यासाठीही उत्कंठेचा विषय आहे. त्यामुळे याबद्दल अधिक माहिती मी स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार असल्याचे लोबो म्हणाले.

कळंगुटमध्येच नव्हे तर शेजारी हणजूण, आसगाव व अन्य भागांमध्ये स्वामीजींचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. स्वामीजींच्या नेमक्या भावना आम्ही जाणून घेणार आहोत. - मायकल लोबो.

आता पणजीलाही भेट देऊन कॅसिनो पाहावे : उदय मडकईकर

पणजीचे माजी महामौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर म्हणाले की, तपोभूमी पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी कळंगुटमधील स्वैराचाराबद्दल जे भाष्य केले आहे, ते सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारे आहे. स्वामीजी चुकून त्या भागात गेले व त्यांनी जे काही पाहिले ते कथन केले आहे. माझी स्वामीजींना विनंती आहे की, त्यांनी रात्री १०:०० नंतर पणजी शहराला भेट द्यावी आणि कसिनो व्यवसाय कसा चालला आहे व पणजीतील लोकांना कसिनोंच्या नावावर काय पाहावे लागत आहे, याचा अनुभव एकदा घ्यावा.

हे अनियंत्रीत पर्यटनाचे दुष्परिणाम आहेत. पर्यटकांचे चोचले पुरविण्यासाठी जे वाममार्ग अवलंबिले आहेत, त्यामुळे पर्यटक तर दूर जात आहेतच. पण झटपट पैसा कमविण्यासाठी ड्रग्ज वगैरेंची विक्री करत आमची तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. राजकारण्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व चालले आहे. ही चिंताजनक बाब आहे. - सखाराम शेणवी बोरकर, लेखक, मडगाव.

 

Web Title: what exactly did swami see in calangute asked mla michael lobo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा