पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:29 PM2018-12-27T12:29:34+5:302018-12-27T12:31:17+5:30

ओल्या पार्टीलाही केवळ 5 मंत्रीच उपस्थित; पैकी दोन पर्रीकर गेल्यानंतर आले.

When the bottle finished at Parrikar's home party for Chief Secretary's ... | पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा...

पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा...

Next

पणजी : मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांची गोव्याहून दिल्लीत बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या खासगी निवासस्थानी बुधवारी रात्री डिनर पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी एका खोलीत बाजूला दारूचीही व्यवस्था होती. काही अधिकाऱ्यांसाठी दारू कमी पडली तेव्हा नवी बाटली आणावी लागली. अर्थात शिष्टाचाराचा भाग म्हणून ही पार्टी आयोजित केली होती, असे सुत्रांनी सांगितले.


या पार्टीवेळी प्रत्यक्ष सीएम उपस्थित असताना फक्त तीन मंत्रीच सहभागी झाले, अशी माहिती लोकमतला मिळाली. दोन मंत्री उशिरा आले तरी, एकूण पाच मंत्रीच सहभागी झाले असा त्याचा अर्थ होतो, असे त्या पार्टीमध्ये भाग घेतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री गेल्यानंतर मग माविन गुदिन्हो व निलेश काब्राल हे दोन मंत्री पार्टीच्या ठिकाणी पोहचले. डिनरसाठी सर्व मंत्री आणि आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व आयएएस अधिकारी व मुख्य सचिव शर्मा उपस्थित राहिले. ते चांगल्या मूडमध्ये होते. काही मंत्र्यांचे वेगळे कार्यक्रम अगोदरच ठरले होते व डिनरचे निमंत्रण काहीजणांना बुधवारी सकाळीच मिळाल्याने ते येऊ शकले नाहीत. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, बांधकाम मंत्री तथा मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, आरोग्य मंत्री विश्वजित राणे व जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर हे मुख्य सचिवांसाठीच्या डिनरला पोहचू शकले नाहीत. यापैकी दोघे मंत्री गोव्याबाहेर असल्याने येऊ शकले नाहीत, अशी माहिती मिळाली. 


कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर व महसूल मंत्री रोहन खंवटे हे डिनरसाठी वेळेत पोहचले. ते मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित असतानाच डिनरमध्ये सहभागी झाले व त्यांनी पर्रीकरांशी गप्पाही मारल्या. भाजपचे मंत्री मिलिंद नाईक तसेच फॉरवर्डचे मंत्री पालयेकर वगैरे या पार्टीला का पोहचू शकले नाही ते स्पष्ट झाले नाही. 


डिनरच्यावेळी ताजे मासे व चिकनसारखा मेनू होता. एका खोलीत बाजूला दारुचीही सोय होती. काही अधिकाऱ्यांनी डिनरला आस्वाद घेतला. बाटली संपली व मद्य कमी पडले तेव्हा एक नवी बाटली आणावी लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: When the bottle finished at Parrikar's home party for Chief Secretary's ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.